मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. ऑटोमोबाइल
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: सोमवार, 9 डिसेंबर 2019 (12:01 IST)

कॉम्प्युटरवरून करा कॉलिंग

मित्रमैत्रिणींनो, लॅपटॉपवर काम करत असताना फोन करण्यासाठी स्मार्टफोन हातात घ्यावा लागणार नाही. कारण तुम्ही लॅपटॉपवरूनच फोन करू शकाल. मायक्रोसॉफ्टचे 'विंडोज 10' यूजर्ससाठी नवं अपडेट जारी केलं आहे. या नव्या फीचरमुळे कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपवरूनफोन करता येणं शक्य होणार आहे. चला तर मग या नव्या फीचरची माहिती घेऊ.
 
* मायक्रोसॉफ्टने 'विंडोज 10 इनसायडर प्रिव्ह्यू बिल्ड 18999'चं अपडेट जारी केलं आहे. यात नवं फीचर जोडण्यात आलं आहे. या अपडेटमुळे विंडोज 10 वापरणार्‍यांना लॅपटॉप आणि कॉम्प्युटरवरूनही फोन करता येणार आहे.
 
* या फीचरचा वापर करण्यासाठी तुम्हाला फोनमध्ये 'युवर फोन अ‍ॅप' डाउनलोड करावं लागेल. हे अ‍ॅप मायक्रोसॉफ्टनेच तयार केलं असून अँड्रॉइड 7.0 आणि त्यापुढच्या व्हर्जन्सवर ते डाउनलोड करता येईल.
 
* या अपडेटनंतर डेस्कटॉपमध्ये डायलर आणि कॉन्टॅक्ट्‌सचे ऑप्शन्स दिसतील. कॉलिंग करण्यासोबतच कॉलिंग हिस्ट्रीही कॉम्प्युटरवर बघता येईल. कॉल नाकारला म्हणजे रिजेक्ट केला तर संदेश पाठवण्याचा पर्यायही डेस्कटॉपवर दिसेल.
 
* या अपडेटमुळे स्मार्टफोन सतत तपासावा लागणार नाही. डेस्कटॉपवरच्या स्पीकर आणि मायक्रोफोनच्या मदतीने तुम्ही आरामात बोलू शकाल.