रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. ऑटोमोबाइल
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: गुरूवार, 22 ऑक्टोबर 2020 (12:32 IST)

फेसबुक वापरकर्त्यांसाठी हे खास फीचर घेऊन आले आहे, आता शेजार्यांविषयी जाणून घेणे सोपे होईल

जगभरात सर्वाधिक वापर केला जाणारा सोशल मीडिया (social media) प्लॅटफॉर्म फेसबुक (Facebook) एका नव्या फीचरवर काम करत आहे. या नव्या फीचरद्वारे युजर्सला आपल्या शेजाऱ्यांना आणखी चांगल्या प्रकारे ओळखण्यास मदत होणार आहे. सध्या कंपनीचं यावर टेस्टिंग सुरू आहे. या फीचरला Neighborhoods असं नाव दिलं जाऊ शकतं.
 
सोशल मीडिया (social media) कंसल्टेंट Matt Navarraने काही दिवसांपूर्वी एक सोशल मीडिया पोस्ट शेअर केली होती. यात त्यांनी सध्या हे फीचर टेस्टिंगच्या सुरुवातीच्या स्टेजमध्ये असल्याचं सांगितलं. जो स्क्रिनशॉट दिलेला आहे त्याला, Neighborhoods बोललं जात आहे. यात युजर्स आपला पत्ता टाकून एक यूनिक प्रोफाईल तयार करू शकतात.
 
फेसबुक (Facebook) आधी नेक्स्टडोरने 2008 मध्ये हे फीचर लाँच केलं होतं. यासाठी कंपनीने जवळपास 470 मिलियन डॉलरची फंडिगही जमवली होती. या फीचरमध्ये प्रत्येक नेबरहुड्स स्वत:च्या मिनी सोशल नेटवर्क रुपात काम करते. यात लोक आपल्या आजुबाजूला घडत असलेल्या क्राईम संदर्भातील घटनाही पोस्ट करतात. फेसबुक या फीचरद्वारे मार्केट लीडर नेक्स्टडोरला (Nextdoor) मागे टाकण्याच्या योजनेवर काम करत आहे. दरम्यान, नेक्स्टडोर येणाऱ्या काही दिवसांत आयपीओ आणण्याच्या तयारीत आहे.