शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. ऑटोमोबाइल
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: गुरूवार, 25 जून 2020 (12:21 IST)

...म्हणून ब्रॉडबँडच्या वापरकर्त्यांमध्ये 57 टक्क्यांनी वाढ

लॉकडाउनच्या  काळात बहुतेक लोकांना घरी बसावं लागलं. वर्क फ्रॉम होम, स्कूल फ्रॉम होम, क्लास फ्रॉम होम बरोबरच मनोरंजनासाठी इंटरनेटच्या वापरात वाढ झाली. यंदा प्रथमच मोबाइल डेटापेक्षा जास्त पसंती ब्रॉडबँड सेवेला आणि विशेषतः वायफायला असल्याचं समोर आलं आहे. मार्च महिन्यापासून ब्रॉडबँडच वापरकर्त्यांच्या संख्येत सुमारे 57 टक्के वाढ झाली. मोबाइल डेटा फोरजी झाल्यामुळे मंदावलेल्या व्यवसायाला नवसंजीवनी मिळाली आहे. 
 
या कालावधीत सुमारे 33 टटक्के ब्रॉडबँड वापरकरर्त्यांनी आपल्या सध्याच्या प्लॅनमध्ये बदल करत जास्त डेटा पॅकचे प्लॅन घेतले आहेत. तर सुमारे 40 टक्के यूजर्सनी स्पीड वाढविला आहे. याचबरोबर ब्रॉडबँड कंपनंनीही 200 एमबीपीएसचे प्लॅन्सबाजारात आणले आहेत. त्यांनाही ग्राहकांची पसंती मिळत असल्याचं ईआय डिजिटल कन्झ्युमर सर्व्हेमध्ये स्पष्ट झालं आहे. या कालावधीत मोठ्या प्रमाणात ब्रॉडबँडला पसंती मिळन्याचंही नमूद करण्यात आलं आहे. या कालावधीत 1200 एमबीपीएसचा वेग देण्याची क्षमता असलेल्या वायफाय  राऊटर्सची मागणीही मोठ्या प्रमाणात वाढली होती. ग्राहकांची पसंती ही 100 ते 300 मीटररपर्यंत रेंज पोहोचेल्या अशा राउटर्सना होती, असंही यात समोर आलं आहे. यामध्ये सध्या विविध नावीन्यपूर्ण राऊटर्स उपलब्ध आहेत. ज्यात मोबाइल राउटर्सचाही समावेश आहे. त्याच्या मागणीत 40 टक्के वाढ झाल्याचं समोर आलं.
 
लॉकडाउनच्या काळात देशातील सर्व प्रकारच्या  इंटरनेट वापरामध्ये 30 टक्के वाढ झाल्याची ही नोंद डिजिटल कन्झ्युमर सर्वे शेपिंग द न्यू  नॉर्मल या पाहणीत समोर  आलं आहे.  या पाहणीत सहभागी झालेल्या 2600 यूजर्सपैकी 76 टक्के यूजर्सकडे जास्त डेटा असलेले इंटरनेट होते. तर 24 टक्के यूजर्सकडे प्राथमिक इंटरनेट सुविधा होती. सुमारे 11 टक्के टूजी ग्राहकांनी फोरजी इंटरनेटला पसंती दिली आहे. 
 
महिन्याला 11 जीबी डेटा 
या कालावधीत प्रत्येक व्यक्ती महिन्याला किमान 11 जीबी डेटा वापरू लागली आहे. तर देशातील इंटनेट वापरात 30 टक्के वाढही नोंदविण्यात आली आहे. यामुळे सध्या  सुमारे 90 टक्के भारतीय स्ट्रिमिंग करू लागले आहेत. या वापरामुळे पुढील दोन ते तीन वर्षांच्या कालावधीत धरलेला अंदाज आता काही  महिन्यांतच पूर्ण झाला आहे. यामुळे येत्या काळात देशात मोठ्या प्रमाणावर इंटरनेट मार्केट उपलब्ध असेल असा अंदाज व्यक्त होत आहे.