कॉपीराईटच्या काळ्या धंद्याला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र सायबर अंतर्गत कार्यान्वित करण्यात आलेले डिजिटल क्राईम युनिट हे देशातील पहिले युनिट आहे. युनिट मुंबईतील वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे कार्यान्वित करण्यात आले आहे.संशोधन, चित्रपट, डिजिटल हाऊस याठिकाणी मोठ्या प्रमाणात कॉपीराईटचे प्रकार घडतात. त्यातून अनेकांना त्यांच्या कामाचा मोबदला मिळत नाही तर आर्थिक नुकसान सोसावे लागते आता या सर्व चोरीला मोठा आळा बसला आहे.