रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. ऑटोमोबाइल
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: गुरूवार, 4 जून 2020 (10:13 IST)

फेक वेबसाईट आणि ई-मेल या प्रकारे ओळखा, चुकूनही क्लिक करु नका

सध्याचा लॉकडाऊनच्या काळात भारतात ऑनलाइन फसवणुकीचे प्रकरणे वाढतच आहेत. नुकतेच महाराष्ट्र सायबर सेलने एक चेतावणी दिली होती ज्यामध्ये त्यांनी लोकांना MONT BLANC कंपनी तर्फे आलेल्या मेसेज किंवा ई-मेलवर न जाण्याचा सल्ला दिला होता. आम्ही आपल्या सांगू इच्छितो आहोत की MONT BLANC ही एक पेनचे निर्माते आहे आणि या कंपनीच्या पेनची किंमत लाखोच्या घरात आहे. 
 
हॅकर्सने या कंपनीच्या नावाच्या फायदा घेउन लोकांची फसवणूक केली आहे. अश्या परिस्थितीत जरुरी आहे की बनावट असलेल्या संकेत स्थळाची आणि ई- मेलची ओळख कशी काय करावी. 
 
* शब्दांवर लक्ष द्या: 
सर्वात आधी कुठल्याही संकेत स्थळाला किंवा ई मेल उघडायच्या आधी त्यांचा वर लिहिलेल्या शब्दांची तपासणी करा. सामान्यपणे बनावटी ईमेल आणि संकेत स्थळावरचे शब्द चुकीचे लिहिलेले असतात. अशुद्ध लेखन देखील आढळंत. पण खऱ्या आणि मूळ असलेले संकेत स्थळ आणि ईमेलमध्ये अश्या चुका आढळत नाही.

* हॅकर्स प्रख्यात कंपनीच्या नावाचे वापर करतात: 
हॅकर्स जगातील मोठ्या कंपनीच्या नावाचे वापर करून लोकांची फसवणूक करतात. जर का आपल्याला या नावाने कुठले ही ईमेल किंवा संकेत स्थळाची माहिती आली तर चुकूनही त्याला भेट देउ नका. इथे आपल्याला सांगू इच्छितो की कुठलीही कंपनी ग्राहकांना थेट संदेश किंवा ईमेल पाठवत नाही.
 
* URL तपासून बघा: 
फसवी साईट किंवा ई मेल लिंक ओळ्खण्यासाठी एक उपाय आहे की कुठल्या ही संकेतस्थळाला किंवा ई मेल उघडण्यापूर्वी त्याच्यावर माउस घेऊन जा. आता आपल्याला पॉपअप म्हणून खरं असलेले URL आणि हायपरलिंक दिसेल. अशाने आपण फसव्या साईटची ओळख करू शकता.
 
* आपली माहिती देउ नका: 
अनेकदा हॅकर्स प्रख्यात कंपनीच्या नावाखाली फसवणूक करण्याच्या हेतूने ई मेल किंवा मेसेज पाठवतात. सावध राहा त्यांना आपली माहिती पासवर्ड, व्यक्तिगत डेटा, डेबिट आणि क्रेडिट कार्डाची माहिती पुरवू नका. असे केल्याने आपण स्वतःला फसविण्यापासून रोखू शकता. सावध राहणं ह्यातच शहाणपणा आहे.