फेसबुक, इंस्टाग्राम थोड्या वेळासाठी बंद होऊन पुन्हा झाले सुरू
फेसबुक आणि इन्स्टाग्राम हे दोन अॅप काही काळासाठी बंद पडले होते. त्यानंतर आता ते पुन्हा सुरू झाले आहे. काही काळासाठी सर्व उपकरणावरील अकाउंट बंद झाले होते. आता ते पुन्हा सुरू झाले आहे. जगभरात या पुन्हा फेसबुक आणि इन्स्टाग्राम सुरू झाल्यानंंतर अनेकांंनी सोशल मिडियावर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
सुरुवातीला युजर्सला वाटलं की केवळ त्यांचेच अकाउंट बंद पडले आहे की काय पण युजर्सनी एकमेकांंना फोन करुन किंवा मेसेज करुन याबाबत विचारणा केल्यावर लक्षात आले की मेटा कंपनीच्या या दोन्ही अॅपमध्ये तांत्रिक समस्या उद्भवल्यानंंतर दोन्ही अॅप्स बंद पडले असावेत. पण आता ते पुन्हा सुरू झाले आहेत यावर युजर्सनी समाधान व्यक्त केले आहे.
हे दोन्ही सोशल मीडिया ऍप जगभरात बंद पडले होते. मेटा कंपनीतर्फे हे दोन्ही प्लॅटफॉर्म चालवले जातात.
लोक वेबसाईट आणि अपवर लॉगईन करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि तिथे त्यांना एरर येत होते तसंच त्यांना पोस्ट्स दिसत नव्हत्या.
Downdetector या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार फेसबुक बंद झाल्याचा 300,000 केसेस आढळल्या आहेत तर 20,000 केसेस इन्स्टाग्रामच्या आहेत.
जगातील अनेक देशांना याचा फटका बसला.
या प्रकरणी मेटाची प्रतिक्रिया घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. मात्र कंपनीच्या पानावर सगळं सुरळीत सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे.
भारतातही अनेक शहरात फेसबुक आणि इन्स्टाग्राम बंद पडलं होतं.
सोशल मीडियावरील लाखो युजर्स याबाबतीत तक्रार करताना दिसले.