मंगळवार, 20 जानेवारी 2026
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By

फेसबुकवर लाइकची इच्छा व्यसनाप्रमाणे

फेसबुक लाइक व्यसन
सोशल नेट‍वर्किंग साईट फेसबुकवर लाइक करणे आणि स्टेट्स टाकणे आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी नुकसानदायक ठरू शकतं. एका शोधात ही माहिती समोर आली आहे.
सॅन डीयेगो स्थित कॅलिफोनिर्या विद्यापीठाच्या एका सहायक प्रोफेसर होली शक्या आणि त्यांच्या सहकार्‍यांनी सुमारे 5, 200 लोकांवर तीन चरणात केलेल्या शोधातून आकडे एकत्र केले आहे. अध्ययनामध्ये सामील लोकांचे सरासरी वय 48 वर्ष आहे. शोधात सामील लोकांचे मानसिक आणि शारीरिक आरोग्याला एक ते चार स्केलवर आणि जीवन संतुष्टतेला एक ते दहा स्केलवर ठेवले आणि त्यांच्या बॉडी मास इंडेक्स संख्येची माहिती काढली.
 
यात सामील लोकांनी आपले फेसबुक आकडे बघण्याची परवानगी दिलेली होती. लाइव्ह साइंसेजप्रमाणे जे लोकं अधिक लाइक इच्छितात त्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम पडतात. शोधकर्त्यांना जे लोकं आपले फेसबुक स्टेटस अधिक अपडेट करतात त्यांचे सरासरी आणि आपले स्टेटस कमी अपडेट करणार्‍यांच्या तुलनेत मा‍नसिक आरोग्यावर अधिक प्रभाव दिसून आला.
 
या समस्यांमध्ये वाढ होत असल्याचे बघून शोधकर्त्यांनी सल्ला दिला की ज्यांचे आरोग्य ठीक नाही त्यांनी फेसबुक वापरणे बंद केले पाहिजे कारण फेसबुकमुळे आरोग्यावर अधिक वाईट परिणाम होऊ शकतो.