बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: बुधवार, 28 मार्च 2018 (11:25 IST)

फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट 14 दिवसांच्या आत आपोआप मिटली जाणार/डिलीट होणार

फेसबुक डेटा लिक प्रकरण एका बाजूला सुरु आहे. मात्र फेसबुक त्यांच्या युझरला नवीन नवीन फिचर देत आहेत. आता फेसबुक ने नवीन फिचर आणले आहे. यानुसार फेसबुकवर सतत कोणाच्या ना कोणाच्या फ्रेंड रिक्वेस्ट येत असतात. मात्र अनेकदा अनेक फ्रेंड रिक्वेस्ट आपण अ‍ॅक्सेप्ट करत नाही. यामुळे कित्येक दिवस, कित्येक महिने किंवा वर्षभर त्या फ्रेंड रिक्वेस्ट इनबॉक्समध्ये पेंडिंग रहात असतात. फेसबुक या समस्येवर काम केले असून, नव्या फीचरची चाचणी सुरु केली आहे. या नवीन फीचरमुळे फ्रेंड रिक्वेस्ट आल्यानंतर ती अ‍ॅक्सेप्ट करण्यासाठी प्रत्येक युजर्सकडे 14 दिवसांचा वेळ असेल, तर आलेल्या रिक्वेस्टखाली मुदत संपायला किती अवधी उरला आहे हे दिसणार आहे. त्यामुळे युजरकडून रिक्वेस्ट 14 दिवसांत अ‍ॅक्सेप्ट केली नाही तर ती ऑटोडिलीट होणार असल्याचे टेक क्रंचने म्हटले आहे. फेसबुकच्या प्रवक्त्यांनी देखील याला अधिकृत दुजोरा दिला आहे. त्यामुळे लवकरच हे फीचर लाईव्ह होणार आहे.