रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. ऑटोमोबाइल
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: गुरूवार, 12 ऑगस्ट 2021 (19:27 IST)

फेसबुकवरील मैत्रिणीने घातला ऑनलाईन 5 लाखाचा गंडा, गुन्हा दाखल

फेसबुक वर अनोखळी लोकांशी मैत्री करून काय प्रकार घडू शकतो याचे उदाहरण नुकतेच समोर आले आहे. उल्हासनगर परिसरात राहणारे महेश राजांनी यांना फेसबुकवरील जेसीका विल्यम्स नावाच्या मैत्रिणीने सोन्याची चेन, अॅपल लॅपटॉप, घड्याळ व आयफोनचा फोटो व्हॉट्सअप नंबर पाठवून युके वरून गिफ्ट पाठविल्याचे सांगितले.

गिफ्ट वरील कस्टम फी विना मैड या नावाने दिलेल्या बँक खात्यत ऑनलाईन जमा करण्यास सांगितले. महेश राजांनी 5 लाख 499 रुपये ऑनलाइन पाठविले. सदर प्रकार 27 जुलै ते 5 ऑगस्ट 2021 दरम्यान घडला असून आपली फसवणूग झाल्याचे समजले. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात जेसिका विल्यम्स व विना मैड यांच्यावर गुन्हा दाखला करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.