सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी जगत
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: बुधवार, 31 ऑगस्ट 2022 (16:17 IST)

SBI च्या ग्राहकांसाठी खुशखबर! बँकेत फेऱ्या मारण्याचा त्रास संपला, WhatsAppवर अनेक महत्त्वाच्या गोष्टी करा

SBI
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) च्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे, आता तुम्हाला बँकेशी संबंधित छोट्या कामासाठी बँकेत जाऊन रांगेत उभे राहण्याची गरज नाही.SBI ने अलीकडेच आपल्या ग्राहकांसाठी WhatsApp बँकिंग सेवा सुरू केली आहे.एसबीआयच्या ग्राहकांना व्हॉट्सअॅपवर मिळणाऱ्या सेवांबद्दल  जाणून घ्या  : 
या सेवा SBI च्या WhatsApp सेवेद्वारे उपलब्ध असतील  
या माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही SBI च्या WhatsApp बँकिंग सेवा वापरू शकता: 
1.Account Balance
2.Mini Statement (शेवटच्या 5 व्यवहारांची माहिती)
SBI ने हे देखील उघड केले आहे की आता खातेदार YONO अॅपमध्ये लॉग इन न करता किंवा मिनी स्टेटमेंटसाठी एटीएमला भेट न देता WhatsApp वर ही माहिती ऍक्सेस करू शकतात.त्यामुळे, जर तुमचेही SBI मध्ये खाते असेल आणि तुम्हाला नवीन SBI WhatsApp बँकिंग सुविधा वापरायची असेल, तर तुम्हाला तुमचे SBI खाते WhatsApp सेवेसाठी नोंदणीकृत करावे लागेल आणि प्रथम SMS द्वारे तुमची संमती द्यावी लागेल. 
SBI WhatsApp बँकिंग सेवेसाठी नोंदणी कशी करावी 
 
स्टेप  1:SBI Whatsapp बँकिंग सेवेसह बँक खाते नोंदणी करण्यासाठी, तुमच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावरून WAREG A/C क्रमांक (917208933148) वर एसएमएस पाठवा.नोंदणी पूर्ण झाल्यावर, तुम्ही SBI ची Whatsapp सेवा वापरण्यास सक्षम असाल.
 
स्टेप 2:Whatsapp वर हाय पाठवा (+909022690226).हा पॉप अप संदेश उघडेल. 
 
स्टेप 3: आता तुम्हाला अकाउंट बॅलन्स, मिनी स्टेटमेंट, डी-रजिस्टर व्हाट्सएप बँकिंगचा पर्याय दिला जाईल.
 
स्टेप 4: खात्यातील शिल्लक तपासण्यासाठी, तुम्हाला 1 टाइप करावे लागेल तर मिनी स्टेटमेंटसाठी तुम्हाला 2 टाइप करावे लागेल.