मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: मंगळवार, 28 ऑगस्ट 2018 (12:19 IST)

गुगलचे सर्च इंजीन होणार अपग्रेड

जाएंट सर्च इंजीन असलेल्या गुगल इंजीनमध्ये देण्यात येणार्‍या जी सूट अ‍ॅप्लिकेशन्सची वाढ करण्यात येणार असून हा सकारात्मक बदल युझर्सना अधिक सुविधा मिळावी, या हेतूने करण्यात येणार आहे. युझर्सच्या सोयीकरिता साईड पॅनला गुगलने उत्तम दर्जाचे बनवले असून एकाचवेळी एकापेक्षा जास्त काम यामध्ये सहज करता येणार आहेत. म्हणजेच तुम्हाला जी-मेल इनबॉक्स मिनिमाइझ करून इतर जी सूट अ‍ॅपचा वापर करता येणार आहे. त्याचबरोबर तुम्ही करत असलेले काम अर्ध्यावर राहिल्यास त्या कामाची आठवण करून देणार आहे. नवीन फीचरच्या माध्यमातून  युझर्सना डोक्ससहित शीट, स्लाइड आणि ड्रॉईंगचा वापर करता येणार आहे. गुगलकडून करण्यात आलेला बदल युझर्र्सना नक्कीच  आवडेल. शिवाय यामुळे त्यांच्या कामात मदत होणार आहे. पुढील पंधरा दिवसात हा बदल सर्व युझर्सना अनुभवता येणार असल्याचे गुगलकडून म्हटले गेले आहे.