बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. ऑटोमोबाइल
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: बुधवार, 27 नोव्हेंबर 2019 (11:34 IST)

Paytm वरून UPI खाते असे करा डिलीट, काळजी करण्याची गरज नाही

पेटीएम आल्यानंतर लोकांना पैसे हस्तांतरित करणे खूप सोपे झाले आहे. तसेच या प्लॅटफॉर्मद्वारे लोक मोबाईल रिचार्जपासून घरी बसून वीज बिलाचे भुगतान करतात. पूर्वी फक्त पेटीएम वॉलेट वापरला जात होता पण आता त्याला युनिफाइड पेमेंट इंटरफेस अर्थात यूपीआयचा पाठिंबा मिळाला आहे. अशात आपण पेटीएमद्वारे थेट लिंक केलेल्या बँक खात्यातून पैसे पाठवू शकता आणि कोणत्याही गोष्टीसाठी भुगतान करू शकता. बर्‍याच वेळा असे होते की आम्ही पेटीएमहून यूपीआय लिंक्ड आपल्या बँक खात्याला डिलीट करू इच्छित असतो परंतु हे थेट डिलीट होत नाही तर आज आम्ही तुम्हाला पेटीएम वरून यूपीआय खाते कसे हटवण्याची पद्धत सांगत आहोत.
 
यूपीआय खाते हटविण्यासाठी प्रथम तुम्हाला पेटीएम अ‍ॅपवर जाण्याची आवश्यकता आहे. यानंतर, आपल्याला यूपीआयच्या ऑप्शनवर क्लिक करावे लागेल.
 
आता तुम्हाला यूपीआय अकाउंट दिसेल. येथे तुम्हाला उजवीकडे तीन डॉट्सचे विकल्प मिळेल.
 
येथे तुम्हाला Deregister UPI Profile ऑप्शनची निवड करावी लागेल. 
 
या पर्यायावर क्लिक करताच ओके ऑप्शनचा मेसेज बॉक्स तुमच्यासमोर येईल. येथे आपल्याला पुन्हा ठीक टॅप करावे लागेल.
 
आता आपले यूपीआय खाते पेटीएम प्लॅटफॉर्मवरून डिलीट होऊन जाईल.