बुधवार, 1 फेब्रुवारी 2023
  1. मराठी बातम्या
  2. ऑटोमोबाइल
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified सोमवार, 25 जानेवारी 2021 (12:52 IST)

जगात सर्वाधिक अॅप्स डाउनलोड करण्यात अव्वल भारतीय

एका रिपोर्टनुसार कोव्हिड-19 दरम्यान जगभरात वर्ष 2020 मध्ये सुमारे 321 मिलियन नवीन इंटरनेट यूजर वाढले आहेत तसेच अॅप्स वापरण्याबद्दल सांगायचे तर 2020 साली जगभरात अॅप स्टोअरवर जवळपास 143 बिलियन डॉलर रुपये खर्च केले गेले आहेत.
 
जगभरात भारतीय सर्वाधिक मोबाइल अॅप्स इंस्टॉल करतात. एकूण मोबाइल अॅप्स डाउनलोड करण्याच्या बाबतीत भारतीय यूजर्सची भागीदारी 14 टक्के इतकी आहे।
 
एप्रिल 2020 मध्ये मोबाइलवर सरासरी 4.2 तास घालवण्यात आले आहे. यात वर्ष 2019 च्या तुलनेत 37 टक्के वाढ नोंदविली गेली आहे. भारत मोबाइलवर वेळ घालवणार्‍या देशांमध्ये यादीत दुसर्‍या क्रमांकावार आहे. 
 
InMobi च्या वार्षिक Mobile Marketing Handbook 2021 च्या रिर्पोटनुसार भारतीय मोबाइल यूजरशी जुळलेले काही मजेदार तथ्य समोर आले आहे.
 
ऑनलाइट गेमिंग मध्ये Arcade गेम खेळणार्‍यांची संख्या 368 टक्के आणि Casual गेम खेळणार्‍यांच्या संख्येत 198 टक्के आणि कॅसिनो गेम खेळण्यात 160 टक्के वाढ नोंद केली गेली आहे.
 
भारतीय शॉर्ट व्हिडिओ बघण्यात दररोज 40 मिनिट खर्च करतात. तसेच 2020 साली भारतीय मोबाइल गेमिंग इंडस्ट्री मध्ये वाढ नोंद झाली आहे. जगभरातील 10 पैकी एक गेमर्स भारतातहून असतात. तसेच भारत एशिया पैसिफिक रीजनचा टॉप मोबाइल गेमिंग मार्केट म्हणून उभा आहे. साथीच्या काळात, दरमहा सरासरी, भारतात सर्वाधिक ऑनलाइन गेम खेळले गेले. रिपोर्टप्रमाणे तरुणांसह गेमिंग भारताच्या 45 ते 54 वर्ष या वयोगटातील लोकांमध्ये देखील प्रसिद्ध आहे.