गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कसे कराल
Written By
Last Modified: सोमवार, 11 जानेवारी 2021 (12:11 IST)

मुलांची इंटरनेट सर्फिंग अशा प्रकारे सुरक्षित करावी

बहुतेक मुले बाहेर खेळण्यापेक्षा घरातच खेळणे पसंत करतात. इंटरनेट सर्फिंग देखील मुलांना खूप आवडते. इंटरनेटवर मुलांसाठी बरेच आवडीचे कन्टेन्ट असतात, परंतु हे खरे आहे की मुलांवर लक्ष ठेवले नाही तर ते नको असलेल्या आणि नकारात्मक साईट वर जाऊ शकतात. नुक्त्यातच दिलेल्या अहवालात म्हटले आहे की प्रौढांपेक्षा किशोरांना इंटरनेट वापरण्याचा धोका जास्त असतो. 

मानसशास्त्रज्ञ म्हणतात की पालकांना मुलांच्या इंटरनेटच्या क्रियाकलापांकडे जास्त लक्ष दिले पाहिजे. त्यांना आपल्या मुलांच्या बदललेल्या व्यवहाराकडे पण जास्त लक्ष द्यायला पाहिजे. कारण होणारे बदल हे भावनिक अत्याचाराचे देखील असू शकतात. असं असेल तर त्या पासून वाचण्याकडे लक्ष दिले पाहिजे आणि त्यापासून वाचण्याच्या पद्धती अवलंबवायला पाहिजे. या साठी सायबर स्पेसला सुरक्षित करण्यासाठी आणि सुट्ट्यांना मजेशीर घालविण्यासाठी काही टिप्स लक्षात ठेवू शकता.

* मुलांशी गोष्टी करा -
जर आपल्या मुलांनी अलीकडेच इंटरनेट सर्फिंग करण्याची सुरुवात केली आहे तर मुलांना त्या संबंधित धोक्याबद्दलची चेतावणी द्यावी. हे देखील आवश्यक आहे की पालकांनी मोकळ्यापणाने मुलांशी बोलावे. या सह मुलांना या इंटरनेटची सवय लागू नाही या कडे देखील लक्ष द्यावे. मुलांनी वापर करण्यापूर्वी आपले सर्व डिव्हाईस सुरक्षित असावे. मुलांना डिव्हाईसचे ऍडमिन बनवू नका. ऑपरेटिंग सिस्टमची नवीनतम आवृत्ती इंस्टाल करावी. हे देखील लक्षात ठेवा की सिस्टम नियमितपणे अपडेट करावे. व्हायरसच्या संरक्षणाची तपासणी आणि अपडेट करत राहा.वेबसाइटवर प्रायव्हसी सेटिंग एनेबल करावी आणि डिव्हाइसमधून जिओलोकेशन सेटिंग डिसेबल करावी. या साठी विंडोज सेटिंग मध्ये अपडेट आणि सिक्योरिटी मध्ये जाऊन सेटिंग अपडेट करा.
 
* युनिक पासवर्ड चा वापर -
इंटरनेट वरून येणारी अवांछित सामग्री येण्यापासून रोखण्याचे सर्वात प्रभावी मार्ग आहे स्ट्रॉंग पासवर्ड. मोठा पासवर्ड ज्या मध्ये लोअरकेस, कॅपिटल लेटर,नंबर आणि सिम्बॉल असतात. असे पासवर्ड ठेवणे सर्वोत्तम मानले जातात. हे देखील आवश्यक आहे की पासवर्ड खूप क्लिष्ट नसावे. उदाहरणार्थ आपण एखाद्या आवडत्या गाण्याला देखील पासवर्ड म्हणून ठेवू शकता.
 
* क्लिक करताना काळजी घ्या-
प्रत्येक ठिकाणी व्हायरस आणि स्पायवेयर असू शकतात,म्हणून कोणत्याही अवांछित पर्यायावर क्लिक करताना सावधगिरी बाळगा, मग ते वेबसाइट असो, लिंक्स असो किंवा ईमेल असो.जर एखादी व्यक्ती जाणकार जरी आहे, तरी देखील कुठेही क्लिक करताना सावध राहा.
 
* वैयक्तिक तपशील सामायिक करू नये- 
मुलांना हे सांगून ठेवा की कोणालाही आपली वैयक्तिक माहिती सामायिक करू नये, ज्यांना ते ओळखत नाही. प्रायव्हसी फिल्टर शिवाय सोशल मीडियावर आपली वैयक्तिक माहिती सामायिक करणे मुलांना अडचणीत टाकू शकतात.पालकांना देखील हे लक्षात असू द्यावे की ज्यावेळी मुलाचे मूड खराब असेल किंवा तो रागात असेल किंवा अति भावनिक असेल तर त्याने सोशल मीडियाचा वापर करू नये.
 
* पेरेंटल कंट्रोल पर्यायाची निवड करा-
पेरेंटल कंट्रोल सेट केल्यावर आपण त्यांच्या कार्यक्षमते बद्दल तपशीलवार बघू शकता. मुलांच्या ऍक्टिव्हिटीला रेस्ट्रिक्ट करणाऱ्या अप्लिकेशनच्या पर्यायाला निवडू शकता. जसे की मुलं कोणती वेबसाइट बघतील, किती वेळ ते कॉम्प्युटर आणि इतर विंडो बेस्ड ऍक्टिव्हिटी मध्ये घालवणार. विंडोज 10 मध्ये पेरन्टल कंट्रोल साठी आपण फॅमिली ऑप्शन ची निवड देखील करू शकता.