सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कसे कराल
Written By
Last Modified: मंगळवार, 29 डिसेंबर 2020 (16:34 IST)

सुरक्षित पीव्हीसी आधार कार्ड बनविण्याची प्रक्रिया जाणून घ्या

भारतात आधार कार्ड गेम चेंजर आहे. सरकारला कोणती ही सरकारी योजनेचा फायदा थेट आधार कार्ड धारकांकडे पोहोचविणे अगदी सोपे झाले आहे. जगभरात आधार कार्ड योजनेचे कौतुक झाले आहे.  
 
जरी या पूर्वी या बाबत बऱ्याच शंका निर्माण केल्या गेल्या, पण कालांतराने या शंका बनावटी सिद्ध झाल्या. म्हणून आधार कार्डचे हे यश स्वतःमधील सर्वात मोठी मोहीम असल्याचे सिद्ध झाले आहे.
 
आजचा काळ स्मार्ट कार्डचा काळ आहे आणि पीव्हीसी (PVC) म्हणजे पॉलिव्हिनाईल कार्ड हे खूप प्रचलित आहे. तर आपण देखील आपले आणि आपल्या परिवाराच्या सदस्यांचे पीव्हीसी आधार कार्ड बनवू इच्छित आहात ? चला तर मग पद्धत जाणून घेऊ या.
 
सर्वप्रथम पीव्हीसी म्हणजे पॉलिव्हिनाईल आधार कार्डाची वैशिष्ट्ये जाणून घेऊ या. 
पीव्हीसी कार्ड केवळ दिसायलाच आकर्षक वाटत नाही तर या मध्ये सर्व सुरक्षेचे उपाय देखील दिले आहेत. आपण हे समजा की या मध्ये होलोग्राम, घोस्ट इमेज, मायक्रो टेस्ट आणि गिलोचे पॅटर्न(Guilloche Pattern)देखील समाविष्ट आहे.
 
हे केवळ आधुनिकच नव्हे तर तितकेच सुरक्षित देखील आहे. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे  की जवळ बाळगायला हे अजिबात त्रासदायक नाही. ज्या प्रकारे आपण इतर कार्ड बाळगता जसे की एटीम कार्ड आणि इतर बँकिंग कार्ड, त्याच प्रमाणे हे देखील आपण सहजपणे आपल्या जवळ बाळगू शकतो. हे खराब होण्याची शक्यता देखील कमी असते.
 
पीव्हीसी आधार कार्ड मिळविण्यासाठी काय करावयाचे आहे? 
जर आपण देखील आपल्या आधार कार्डाचे पीव्हीसी रूप मिळवायचे असेल तर  या साठी फक्त 50 रुपयांचा खर्च येईल. या साठी आपल्याला आधारकार्डाचे अधिकृत संकेत स्थळांवर  (https://uidai.gov.in/) जावे लागेल इथे माय आधार सेक्शनवर ऑर्डर आधार पीव्हीसी कार्डाचे ऑप्शन लिहिलेले येईल, इथे क्लिक करा. इथे आपले आधार क्रमांक किंवा वर्च्युअल आयडी(Virtual ID)किंवा ईआईडी (EID) द्यावे लागेल. कॅप्चा टाकल्यावर आपल्या मोबाईल वर एक ओटीपी येईल.    

ओटीपी प्रविष्ट केल्यावर आपल्याला पेमेंट चे ऑप्शन दिसते, जे आपण यूपीआय किंवा बँकिंग कार्डाच्या द्वारे सहजपणे करू शकता. नंतर 50 रुपये फी दिल्यावर पुढील 7 दिवसात आपल्याला पीव्हीसी कार्ड मिळेल.आहे न मग हे सोप! 
 
खरं सांगावे तर आधार कार्डाचे हे वैशिष्ट्ये खूपच उपयुक्त आहे. सांगू इच्छितो की आधारच्या अधिकृत ट्विटर अकाउंट (@UIDAI) वरून ही माहिती 10 ऑक्टोबर रोजी अधिकृतपणे ट्विट करून देण्यात आली होती. हे कार्ड थेट आधार कार्यालयातून दिले जाते, जे उत्कृष्ट प्रिंटिंग क्वालिटी आणि लॅमिनेशन केलेले आहे. 
आधाराचे पीव्हीसी कार्ड प्रिंट झाल्यावर स्पीड पोस्टने आपल्या नोंदणीकृत आधार पत्त्यावर पोहोचविण्यात येतील.
 
चला तर मग वाट कशाची बघता ? आपल्या सह आपल्या कुटुंबातील इतर सदस्यांचे पीव्हीसी आधार कार्ड बनवा आणि आकर्षक, सुरक्षित पीव्हीसी कार्ड आपल्या पाकिटात ठेवण्यासाठी सज्ज राहा.