रविवार, 21 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सप्तरंग
Written By
Last Modified: बुधवार, 23 डिसेंबर 2020 (12:15 IST)

पेपरक्लिपच्या मदतीने क्रिएटिव्ह व्हा

पेपर क्लिप एक अशी गोष्ट आहे, ज्याचा वापर ऑफिस मध्ये केला जातो. जेव्हा पासून वर्क फ्रॉम होम ची प्रथा वाढली आहे, या पेपर क्लिप चा वापर लोक घरात करू लागले आहेत. असे विचारले गेले की पेपर क्लिप कोणत्या कामी येतात तर आपले उत्तर असेल की कागदांना व्यवस्थित आयोजन करण्यासाठी. हे खरे आहे की पेपर क्लिपचे मुख्य वापर या साठीच आहे. पण खरं तर हे केवळ कागदपत्रांना व्यवस्थित ठेवण्यासाठीच नव्हे तर ह्याचे वापर बऱ्याच प्रकाराने करता येऊ शकते का ह्याचा विचार करावा. अशा प्रकारे आपल्याला हे खूप उपयुक्त होईल. चला तर मग आज आम्ही आपल्याला पेपर क्लिपचे काही चांगले वापर सांगत आहोत. 
 
* लहान पेचकस बनवा- 
हे ऐकायला विचित्र वाटेल पण आपण पेपर क्लिप ला लहान पेचकस प्रमाणे देखील वापरू शकता. आपला चष्म्याचा स्क्रू सैल झाला आहे तर त्याला घट्ट करण्यासाठी आपण पेपर क्लिप चा वापर सहजपणे करू शकता.
 
* फोटो फ्रेम बनवा -
तसे तर फोटो सजविण्यासाठी आपण फोटो फ्रेम चा उपयोग करतो.आपण घरात फोटो वेगळ्या प्रकारे सजवू इच्छित असाल तर आपल्यासाठी एक मोठी बाइंडर क्लिप उपयुक्त ठरेल.
 
* दागिने बनवा -
 बाजारपेठेत दागिने महाग मिळतात, आपण घरातच या पेपर क्लिप ने दागिने बनवू शकता या साठी आपल्याला दोन किंवा अधिक पेपर क्लिप ची आवश्यकता असेल. या व्यतिरिक्त आपल्या दागिन्यांचा हूक मागून तुटला असेल तर या स्थितीत देखील आपण पेपर क्लिप च्या मदतीने त्याला लावू शकता.  
 
* रेझर कव्हर बनवा- 
प्रवासाला जाताना रेझर मुळे बॅगचे नुकसान होतात. आपल्याला रेझरला बॅग मध्ये व्यवस्थित ठेवायचे असेल तर आपण रेझर ला बाइंडर क्लिपच्या साहाय्याने कव्हर करू शकता.