शनिवार, 6 डिसेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: सोमवार, 21 डिसेंबर 2020 (08:18 IST)

मुंबईकरांना भविष्यात प्रवासासाठी वातानुकूलित बैलगाडा मिळणार

Mumbai

आरेतील मेट्रो कारशेड कांजूरमार्गला हलवण्यावरुन ठाकरे सरकार आणि भाजपमध्ये वाद पेटला आहे. या मुद्द्यावरुन भारतीय जनता पक्षाचे आमदार आणि नेते आशिष शेलार यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. ‘मुंबईकरांना भविष्यात प्रवासासाठी वातानुकूलित बैलगाडा मिळणार’, असे म्हणत त्यांनी ट्विवटरवरुन शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

‘बुलेट ट्रेन नकोच म्हणतात. मेट्रो होऊच नये’,अशी व्यवस्था करताय आणि बेस्टचे खाजगीकरण करुन मुंबईकरांची महत्त्वाची व्यवस्था मोडित काढताय मुंबईकरहो! ठाकरे सरकारचा हा तीन तिघाडा. मुंबईकरांना भविष्यात प्रवासासाठी बहुतेक मिळणार वाचानुकूलित बैलगाडा’!, असं ट्विट आशिष शेलाय यांनी केले आहे.