मुंबईचा हवेचा गुणवत्ता निर्देशांक घसरून वाईट स्तरावर

 
Last Modified गुरूवार, 17 डिसेंबर 2020 (09:01 IST)
मुंबई शहर आणि उपनगरात अनेक ठिकाणी हवेचा गुणवत्ता निर्देशांक घसरून वाईट स्तरावर पोहोचला. कमी झालेले किमान तापमान, कोरडे वारे आणि वाहनांची वाढलेली संख्या यामुळे गुणवत्ता निर्देशांक वाईट स्तरावर पोहोचल्याचे दिसून येत आहे.
‘सफर’ (सिस्टीम ऑफ एअर क्वॉलिटी अ‍ॅण्ड वेदर फोरकास्टिंग अ‍ॅण्ड रिसर्च) आणि ‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळां’च्या नोंदीनुसार बोरिवली (पूर्व), चकाला-अंधेरी, कुर्ला, मालाड (प.), पवई, विलेपार्ले (प.) या ठिकाणी हवेचा गुणवत्ता निर्देशांक वाईट स्तरावर (प्रदूषक घटकांचे प्रमाण २०० ते ३००) राहिला. वांद्रे कुर्ला संकुलात तो अति वाईट स्तरावर पोहोचला. त्या ठिकाणी पीएम २.५ या प्रदूषक घटकाचे प्रमाण ३५० इतके नोंदविण्यात आले. विशेषत: सायंकाळी उपनगरातील अनेक भागात धुरकट वातावरणाचा अनुभव आला.
थंडीच्या काळात कोरडे वारे आणि धुरक्याचा प्रभाव मुंबई आणि परिसरात अनेकदा जाणवतो. त्यातच वाऱ्यांची गती कमी झाली की परिणामी जमिनीलगतचे प्रदूषक घटक हवेत विरून जात नसल्याने हवेचे प्रदूषण वाढते असे अधिकाऱ्यांनी सांगितले.


यावर अधिक वाचा :

रघुराम राजन : 'केंद्र सरकार महसुलातून मिळालेला पैसा ...

रघुराम राजन : 'केंद्र सरकार महसुलातून मिळालेला पैसा राज्यांना वाटत नाही'
केंद्र सरकार महसुलाच्या माध्यमातून मिळत असलेले पैसे योग्य प्रमाणात राज्य सरकारांना वाटप ...

प्रभावशाली व्यक्तींमध्ये अनेक भारतीय

प्रभावशाली व्यक्तींमध्ये अनेक भारतीय
पीएम मोदींनी पुन्हा एकदा जगात एक जबरदस्त विजय मिळवला आहे. टाइम मासिकाने प्रसिद्ध केलेल्या ...

कोरोना लस : कोण-कोणते देश लहान मुलांचं लसीकरण करतायेत आणि ...

कोरोना लस : कोण-कोणते देश लहान मुलांचं लसीकरण करतायेत आणि का?
यूकेच्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानंतर, यूकेतील 12 ते 15 वर्षं वयोगटातील ...

राहुल गांधी: महात्मा गांधींप्रमाणे मोहन भागवतांचा ...

राहुल गांधी: महात्मा गांधींप्रमाणे मोहन भागवतांचा महिलांबरोबर कधी फोटो पाहिलाय?
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी भाजपा आणि रा. स्व. संघ हे 'महिला विरोधी' आणि 'हिंदू ...

कोकणासाठी 3 हजार 200 कोटींचा आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रम

कोकणासाठी 3 हजार 200 कोटींचा आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रम
कोकणामध्ये “कोकण आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रम” राबविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आज झालेल्या ...

सरकारचा निर्णय, देशांतर्गत उड्डाण 85 टक्के क्षमतेने चालवता ...

सरकारचा निर्णय, देशांतर्गत उड्डाण 85 टक्के क्षमतेने चालवता येईल
विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्वाची बातमी. खरं तर, नागरी उड्डयन मंत्रालयाने ...

आज किंवा उद्या कधीना कधी सरकार पडेल : नारायण राणें

आज किंवा उद्या कधीना कधी सरकार पडेल : नारायण राणें
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेना खासदार संजय राऊतांसह ठाकरे सरकारवर ...

हे सर्व जण मुंगळ्यासारखे सत्तेला चिकटून बसलेले आहेत : ...

हे सर्व जण मुंगळ्यासारखे सत्तेला चिकटून बसलेले आहेत : प्रविण दरेकर
शिवसेना असो वा महाविकास आघाडी सरकारमधील राष्ट्रवादी- कॉंग्रसेचे नेते असतील, त्यांची ...

चित्रपटगृह न उघडल्याने कंगनाची महाराष्ट्र सरकारवर टीका

चित्रपटगृह न उघडल्याने कंगनाची महाराष्ट्र सरकारवर टीका
बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतच्या प्रदर्शित झालेला सिनेमा थलाइवीसिनेमासाठी तामिळ आणि ...

राज्यप्राण्याचा दर्जा असलेल्या दुर्मीळ शेकरुची विक्रीचा ...

राज्यप्राण्याचा दर्जा असलेल्या दुर्मीळ शेकरुची विक्रीचा नाशिकमध्ये प्रयत्न
वन्यजीव संरक्षण कायद्यान्वये अनुसुची-१मध्ये समाविष्ट आणि राज्यप्राण्याचा दर्जा असलेल्या ...