शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: बुधवार, 16 डिसेंबर 2020 (16:42 IST)

काय म्हणता, मुंबईतील सांडपाण्यात कोरोनाचा विषाणू

मुंबईत कोरोनाचे संक्रमण कमी झाले असताना मुंबईतील सांडपाण्यात कोरोनाचा विषाणू आढळून आला आहे. आयसीएमआरने 11 मे ते 22 मे दरम्यान धारावीसह पाच ठिकाणांहून गोळा केलेल्या नमुन्यांतील अहवालात हा धक्‍कादायक प्रकार समोर आला. 
 
दिवसागणिक वाढणार्‍या रुग्ण संख्येच्या कालावधीत ‘इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च’ने (आयसीएमआर) वडाळा, धारावी, कुर्ला, शिवाजी नगर, मालाड, कांजूरमार्ग या सहा ठिकाणी 16 मार्चपूर्वी घेतलेल्या नमुन्यांत कोरोना विषाणू आढळला नाही. मात्र, 11 ते 22 मे दरम्यानच्या नमुन्यांत कोरोना विषाणू आढळला. कोरोना बाधितांच्या मलातून हा विषाणू सांडपाणी वाहिनीत जातो, असा संशय होता. आयसीएमआरनेही सांडपाणी वाहिन्यांमध्ये कोरोना विषाणू जिवंत राहत असल्याचे अहवालात नमूद केले आहे.