बुधवार, 17 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कसे कराल
Written By
Last Modified: सोमवार, 28 डिसेंबर 2020 (10:23 IST)

जन्म आणि मृत्यूच्या नोंदणीसाठी आधार कार्ड अनिवार्य नाही

आपल्यातील बऱ्याच जणांना या प्रक्रियेबद्दल माहीतच असेल, पण नवीन अपडेट्स असे आले आहेत की आता जन्म आणि मृत्यूच्या नोंदणीसाठी आधार क्रमांकाची काहीच आवश्यकता नाही. बऱ्याच लोकांनी या प्रक्रियेसाठी आक्षेप घेतला होता आता आधार क्रमांकाच्या शिवाय देखील जन्म आणि मृत्यूची नोंदणी केली जाऊ शकते. चला याची संपूर्ण प्रक्रिया जाणून घेऊ या. 
 
देशभरात कोठेही मुलाचे जन्म झाल्यास किंवा कुटुंबात एखाद्याचा मृत्यू झाला असल्यास, याची नोंद जन्म-मृत्यू रजिस्ट्रारच्या कार्यालयात जमा करणे आवश्यक आहे. खेड्यातील ग्राम पंचायत कार्यालयात आणि आपण शहरात राहत असाल आपले घर शहरी भागात असल्यास, नगरपालिका, नगर परिषद किंवा नगर निगमच्या कार्यालयात नोंदणी करू शकता.
 
आजही बरेच लोक जन्म-मृत्यू चे प्रमाणपत्र बनविण्याला एवढ्या गांभीर्याने घेत नाही, म्हणून त्यांचा साठी हे समजणे आवश्यक आहे की कायद्याने ही एक महत्त्वाची प्रक्रिया आहे, जी  वेळीच पूर्ण करणे आवश्यक आहे. 
 
या प्रमाणेच, जन्माचे प्रमाणपत्र तर मुलांच्या भविष्याशी निगडित सर्वकामां मध्ये उपयुक्त आहे. शाळेत दाखला घेताना जन्म प्रमाणपत्राची आवश्यकता आहे. 

अशा प्रकारे ड्रायव्हिंग लायसन्स बनविताना,पासपोर्ट बनविताना किंवा एखादी विमा पॉलिसी घ्यावयाची असल्यास किंवा इतर शिधापत्रिका किंवा रेशनकार्ड किंवा सोशल सिक्युरिटी कार्यक्रम मध्ये भाग घेण्यासाठी ह्याचा वापर केला जातो.म्हणून आपण जन्म-प्रमाणपत्र आवर्जून बनवावे.
 
अशा प्रकारे मृत्यूच्या नोंदणीचे देखील फायदे आहे या मध्ये सर्वात मोठा फायदा वारसा हक्का विषयी आहे. या मध्ये संपत्तीचे वितरण किंवा हस्तांतरण तेव्हाच शक्य आहे, जेव्हा मृत्यूचे प्रमाणपत्र आपल्याकडे आहे. या शिवाय पेंशन, विमा, जमिनीच्या हस्तांतरणाची प्रक्रिया मृत्यू प्रमाण पत्र मिळण्याच्या नंतरच होते. 

सांगू इच्छितो की ही संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य आहे आणि जन्म किंवा मृत्यूच्या 21 दिवसाच्या आत कुटुंबातील कोणताही सदस्य याची नोंदणी करू शकतो. 21 ते 30 दिवसाच्या आत 2 रुपयांचे विलंब शुल्क द्यावे लागते तर 30 दिवस ते 1 वर्षाच्या आत नोंदणी केल्याने नोटरीकडून पत्र सत्यापित करवून जिल्हा सांख्यिकी अधिकारी किंवा अतिरिक्त जिल्हा पंजीयक किंवा विकास अधिकारी कडून प्रतिज्ञापत्र सही करवावे लागते.
 
 या नंतर जन्म-मृत्यूचे प्रमाणपत्र मिळतात. म्हणून 21 दिवसाच्या आतच या प्रक्रियेला पूर्ण करावे. जरी घटना किती ही जुनी असो जन्म-मृत्यूच्या नोंदणी अधिनियम 1969 च्या 9 (3 )च्या नुसार नोंद केली जाऊ शकते. 
 
वेग वेगळ्या राज्यात वेगवेगळ्या वेबसाइट्स वर ही प्रक्रिया ऑनलाईन केली जात आहे, परंतु मुळात नियम सर्वत्र एकसारखेच आहे आणि आता या साठी आधार कार्ड बनविण्याची देखील आवश्यकता नाही. सांगत आहोत  की रजिस्ट्रार ऑफ जनरल इंडिया(आरजीआय)ने ही माहिती दिली आहे की आता जन्म आणि मृत्यू नोंदणी साठी आधार क्रमांक अनिवार्य नाही. एवढेच नव्हे तर आरजीआय ने ही माहितीएका आरटीआय च्या प्रत्युत्तरात दिली आणि परिपत्रक जारी करताना म्हणाले की जर कोणी व्यक्ती स्वेच्छाने आधार क्रमांक देतो तर कोणत्याही परिस्थितीत हे खात्री करावे लागेल की आधार कार्डाची प्रिंटआऊट तर घेतलेली नाही आणि जन्म-मृत्यूच्या डेटाबेस मध्ये आधार कार्डाचे क्रमांक नसावे. 
 
परिपत्रिकेत स्पष्टपणे नमूद केले आहे की 'कोणत्याही परिस्थितीत आधार क्रमांक डेटाबेस मध्ये संग्रहित केले जाणार नाही, तसेच कोणत्याही दस्तएवजेवर प्रिंट केला जाणार नाही. आवश्यक असल्यास आधार क्रमांकाचे पहिले चार अंकच प्रिंट केले जाऊ शकतात.
 
आपल्याला काहीच माहिती नसल्यास आपण आपल्या जवळच्या सीएससी(कॉमन सर्विह्स सेंटर -जनसुविधा केंद्र)वर जाऊन ह्याची संपूर्ण माहिती घेऊ शकता. तिथल्या राज्यानुसार अचूक माहिती मिळण्याची शक्यता आहे.