सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कसे कराल
Written By
Last Modified: सोमवार, 4 जानेवारी 2021 (18:12 IST)

फास्टटॅग विषयी काही माहिती.....

1. ज्यांच्या नावावर गाडी (RC) आहे त्यांनीच त्यांचे वैयक्तिक खाते फास्ट टॅगला जोडायचे आहे.
 
2. फास्टटॅग हा गाडीच्या आतील बाजूने, समोरील काचेच्या वरच्या बाजूच्या मध्यावर (Top Centre), आरशाच्या मागील बाजूस लावायचा आहे, म्हणजे तो व्यवस्थित स्कॅन होईल. कडेला लावल्यास टोल नाक्यावर बरीच कसरत करावी लागेल. 
 
3. टॅगवर ज्या बाजूला Fastag असे लिहीले आहे ती बाजू आपल्याकडे ठेवून, टॅग काचेवर लावायचा आहे. एकदा टॅग लावल्यानंतर तो परत काढता येत नाही म्हणून लागण्यापूर्वी आतील काच स्वच्छ करुनच टॅग लावावा.
 
4. सर्व टोल नाक्यावर लवकरच, केवळ एक लेन सोडून, बाकी सर्व लेन्स फास्ट टॅग स्कॅन करणा-या यंत्रणेने सुसज्ज होतील.
 
5. ज्या वाहनाला फास्ट टॅग नाही परंतु ते वाहन जर या फास्टटॅग लेन मधून जात असेल तरच दुप्पट टोल भरावा लागेल. जे अजून फास्टटॅग मिळवू शकले नाहीत त्यांच्यासाठी प्रत्येक टोल नाक्यावर एक वेगळी लेन असेल, त्या लेन मधून गेल्यास दुप्पट टोल भरावा लागणार नाही.
 
6. प्रवासाला निघण्यापूर्वी, फास्टटॅग ज्या खात्याशी जोडलेले असेल त्या खात्यात टोलसाठी आवश्यक तेवढे पैसे असल्याची खात्री करुनच प्रवासाला निघावे, अन्यथा फास्टटॅग लेन मधून गेल्यास, रोख दुप्पट टोल भरावा लागेल.
 
7. सर्वात महत्वाचे....फास्टटॅग लेनमधे चेकिंग पाॅईंटवर आल्यानंतर आपल्या पुढची गाडी (स्कॅनिंग होत असलेली) व आपली गाडी, यामधे तीन मीटर पेक्षा जास्त अंतर ठेवायचेच आहे. कदाचित पुढच्या गाडीच्या टॅगला काही अडचण असेल तर विनाकारण आपला टॅग स्कॅन होऊन त्या गाडीचा टोल आपल्या खात्यातून जाऊ शकतो.