गुरूवार, 21 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 26 डिसेंबर 2020 (08:33 IST)

एकनाथ शिंदे यांच्या कारला वाशी टोलनाक्याजवळ अपघात

Eknath Shinde
राज्याचे नगरविकास मंत्री व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कारला वाशी टोलनाक्याजवळ अपघात झाला असून या अपघातात शिंदे थोडक्यात बचावले आहेत. मुंबईच्या दिशेने येत असताना वाशी टोलनाका ओलांडल्यानंतर काही अंतरावरच हा अपघात झाला. अपघातात शिंदे यांच्या हाताला मार लागला व अंगठ्याला दुखापत झाली आहे.  
 
या अपघातामध्ये, एकनाथ शिंदे आपल्या टोयटा एसयूव्ही गाडीने वाशी टोलनाका ओलांडल्यानंतर शिंदे यांच्या कारला अपघाताला सामोरे जावे लागले. या अपघातात सुदैवाने शिंदे यांना कोणतीही गंभीर इजा झाली नाही. शिंदे यांच्या हाताला किरकोळ मार लागला असून अंगठ्यालाही दुखापत झाली आहे. अपघातात गाडीच्या पुढच्या भागाचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे.