शनिवार, 22 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: शुक्रवार, 31 मार्च 2017 (21:30 IST)

Jio ची फ्री सर्विस आता 15 एप्रिलपर्यंत, कंपनीने रजिस्ट्रेशनासाठी दिली 15 दिवसांची मुदत

jio extended the period of subscription till 15-april
जियो यूजर्ससाठी एक मोठी खुशखबरी आहे. कंपनीने आपल्या ग्राहकांना सब्सक्रिप्शनसाठी आता 15 एप्रिलपर्यंतची मुदत दिली आहे. या अगोदर ही स्कीम 31 मार्च पर्यंतच होती, ज्याला आता कंपनीने वाढवून 15 एप्रिल केले आहे.  
 
अर्थात जियोच्या ज्या यूजर्सने आतापर्यंत जियोची प्राइम मेंबरशिप घेतली नव्हती, ते आता 15 एप्रिलपर्यंत ही मेंबरशिप घेऊ शकतात. तसेच यूजर्सला जियो स्कीमचा फायदा उचलण्यासाठी  कंपनीकडून निर्धारित टॅरिफ प्लानला देखील रिचार्ज करावे लागणार आहे.   
 
तसेच ज्यांनी #JioPrime रजिस्ट्रेशनासोबत 303₹ चा टॅरिफ चुकवला आहे, त्यांचा टॅरिफ आता जुलैपर्यंत कॅरी फारवर्ड होऊन जाईल.