रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी जगत
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Updated : गुरूवार, 25 जुलै 2024 (17:10 IST)

JioThings आणि MediaTek ने दुचाकी बाजारात 4G स्मार्ट अँड्रॉइड क्लस्टर आणि 4G स्मार्ट मॉड्यूल लाँच केले

जगातील आघाडीची सेमीकंडक्टर कंपनी MediaTek आणि JioThings Limited ने दुचाकी बाजारासाठी “मेड इन इंडिया” स्मार्ट डिजिटल क्लस्टर्स आणि स्मार्ट मॉड्यूल्स लाँच केले. यामुळे दुचाकी बाजारात आणि विशेषत: इलेक्ट्रिक वाहन (EV) श्रेणीत खळबळ उडाली आहे. JioThings Limited ही एंड-टू-एंड इंटरनेट ऑफ थिंग्ज सोल्यूशन्सची प्रदाता आहे आणि Jio Platforms Limited ची उपकंपनी आहे.
 
जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेडचे ​​अध्यक्ष किरण थॉमस यांनी या भागीदारीबद्दल सांगितले की, “मोबिलिटी उद्योगात क्रांती घडवून आणण्यासाठी मीडियाटेकसोबत सहकार्य करताना JioThings ला आनंद होत आहे. MediaTek चे प्रगत चिपसेट आमच्या अत्याधुनिक डिजिटल सोल्यूशन्ससह एकत्रित करून, आम्ही नवीन मानके सेट करू. जे ग्राहकांच्या अनुभवात सुधारणा करून गतिशीलतेचे भविष्य बदलेल.”
 
ग्राहकांना “Jio Automotive App Suite” मध्ये प्रवेश मिळेल, ज्यामुळे त्यांना Jio Voice Assistant, JioSaavn, JioPages, JioXploR सारख्या अनेक सेवा बंडल रुपात मिळतील. JioThings चे स्मार्ट डिजिटल क्लस्टर AvniOS वर आधारित आहे. स्मार्ट डिजिटल क्लस्टर आणि ऑपरेटिंग सिस्टम रिअल-टाइम डेटा विश्लेषण करते. यात वाहनाच्या चांगल्या नियंत्रणासाठी एक उत्तम इंटरफेस आहे आणि सहज नियंत्रणासाठी आवाज ओळखतो.
 
मीडियाटेकचे कॉर्पोरेट सीनीयर व्हॉइस प्रेसिडेंट आणि इंटेलिजेंट डिव्हाइसेस बिझनेस ग्रुपचे महाव्यवस्थापक जेरी यू म्हणाले की “मीडियाटेकद्वारे समर्थित टू-व्हीलर स्मार्ट डिजिटल क्लस्टरवर JioThings सोबतचे सहकार्य IoT आणि ऑटोमोटिव्ह या दोन्ही क्षेत्रांतील नाविन्यपूर्णतेची आमची वचनबद्धता आणखी मजबूत करते. हा क्लस्टर टू-व्हीलर स्मार्ट डॅशबोर्डच्या भविष्यासाठी आमच्या दृष्टीकोनाशी सुसंगत आहे.”
 
कंपनीने आपल्या निवेदनात म्हटले आहे की मीडियाटेकचे अत्याधुनिक चिपसेट तयार करण्यातील कौशल्य आणि जिओच्या उत्पादनातील नावीन्यपूर्ण इतिहासामुळे ते केवळ भारतातच नव्हे तर जागतिक बाजारपेठेतही टर्नकी आधारावर हे समाधान देऊ शकेल. 2025 च्या अखेरीस भारतीय दुचाकी ईव्ही बाजार 10,000 कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. ज्यामध्ये 30 लाखांहून अधिक वाहने रस्त्यावर असतील. JioThings आणि MediaTek यांच्यातील हे सहकार्य ऑटोमोटिव्ह उद्योगातील इलेक्ट्रॉनिक वाहनांची वाढती मागणी पूर्ण करेल.