शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. ऑटोमोबाइल
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: बुधवार, 11 डिसेंबर 2019 (09:59 IST)

जिओने 98 रुपयांचा प्लॅन केला अपडेट

रिलायंस जिओने आपला 98 रुपयांचा प्लॅन अपडेट केला आहे. टॅरिफ प्लॅनमध्ये दरवाढ करतेवेळी कंपनीने 98 रुपयांचा हा प्लॅन बंद केला होता. त्याऐवजी 129 रुपयांचा प्लॅन कंपनीने आणला होता. पण, दरवाढीनंतर काही दिवसांमध्येच कंपनीने 98 रुपयांचा प्लॅन पुन्हा आणला असून त्यासोबतच 129 रुपयांच्या प्लॅनचा पर्यायही आहे. 
 
असा आहे प्लॅन –
 
28 दिवसांची वैधता, एकूण 2 जीबी डेटा, इंटरनेट मर्यादा संपल्यानंतर इंटरनेट स्पीड 64Kbps याशिवाय जिओ ते जिओ कॉलिंग मोफत अशा सुविधा या प्लॅनमध्ये आहेत. इतर कंपन्यांच्या नेटवर्कवर कॉल करण्यासाठी पैसे आकारले जातील, याशिवाय कंपनी या प्लॅनसोबतच IUC व्हाउचरची सेवा देखील देत आहे (अन्य नेटवर्कवर कॉलिंग). तसंच, आता या प्लॅनमध्ये 300 एसएमएस मिळतील.