इंटरनेटशिवाय देखील शेअर करू शकता लोकेशन
पत्ता किंवा जागा सांगण्यासाठी बरेच लोकं ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम (जीपीएस)चा वापर करतात कारण की जीपीएस आणि व्हाट्सएप दोन्ही इंटरनेटवरून चालवता येतात. पण, जर आपला इंटरनेट काम करत नसेल तर? अशी अडचणी टाळण्यासाठी इंटरनेटशिवाय आपण आपली लोकेशन दुसर्या व्यक्तीसह शेअर करू शकता. चला त्याबद्दल जाणून घ्या.
स्मार्टफोनवर इंटरनेट कनेक्टिव्हिटी नसल्यावर वापरकर्त्याला त्याच्या फोनमध्ये सर्वात आधी गुगल मॅप्स उघडावे लागेल. या नंतर वापरकर्त्याला गुगल मॅप्सवर आपली लोकेशन माहित करावी लागेल. यासाठी, तो जवळील कॉलनी, ब्लॉक किंवा जवळ-पासच्या लॅंडमार्कची मदत घेऊ शकतो.
उदाहरणार्थ जर वापरकर्ता दिल्लीच्या मुखर्जी नगरमध्ये आहे तर गुगल मॅप्सवर मार्ग क्रमांक किंवा ब्लॉक शोधा.
त्या लॅंडमार्कवर पोहोचल्यावर, थोडा वेळ त्या ठिकाणी स्पर्श करून ठेवा. त्यानंतर त्या लोकेशनवर लाल बिंदू दिसेल. हे दिसल्यानंतर, फोन स्क्रीनच्या तळाशी तीन पर्याय दिसतील,
1. डायरेक्शन
2. शेअर
3. सेव
लोकेशन शेअर करण्यासाठी शेअर पर्याय वर क्लिक करा. नंतर टेक्स्ट मेसेज पर्याय निवडा. यानंतर, आपल्या ओळखीच्या माणसंसह ते स्थान शेअर करू शकता.
* इंटरनेट नसल्यावर मार्ग देखील दाखवतो - गुगल मॅप्समध्ये स्क्रीनवर लाल बिंदू आल्यानंतर आपण खाली दिलेले दिशानिर्देश वापरू शकता. तथापि यात लक्षात ठेवण्याची गोष्ट म्हणजे गुगल मॅप्स फक्त त्या ठिकाणी पोहोचण्याचा मार्ग सांगू शकतो, जे त्यात आधी पासूनच सेव आहे. हे फीचर वापरण्यापूर्वी आम्ही सल्ला देतो की आपण एका नवीन ठिकाणी जाण्यापूर्वी नक्कीच त्या ठिकाणाचा नकाशा डाउनलोड करा, कारण गरज पडल्यास आपण ते ऑफलाइन वापरू शकता.
* गुगल मॅप्स याप्रकारे ऑफलाइन डाउनलोड करा - गुगल मॅप्स आपल्या गरजेनुसार डाउनलोड करण्यासाठी प्रथम जेथे वापरकर्ता जात आहे त्या ठिकाणचे नाव शोधा. त्यानंतर, खाली एक बॉक्समध्ये डायरेक्शन दिसेल, त्या बॉक्सवर क्लिक करा. लक्षात ठेवा, डायरेक्शन पर्यायावर नव्हे तर त्याच्या जवळ बॉक्सवर क्लिक करा. त्यानंतर तो बॉक्स स्क्रीनवर वरच्या बाजूला चढून जाईल. येथे तुम्हाला चार पर्यायांमधून एक डाउनलोडचा पर्याय मिळेल, त्यावर क्लिक करा. त्यानंतर ते आपल्याला जागा निवडण्यासाठी बॉक्स देईल, ज्यात आपण आवश्यकतानुसार डाउनलोड करू शकता.