बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 25 फेब्रुवारी 2019 (10:13 IST)

'केसरी' ट्रेलर आता पर्यंत २ कोटी चाहत्यांनी पाहिला

अभिनेता अक्षय कुमारचा बहुप्रतिक्षीत 'केसरी' सिनेमाचा ट्रेलर शुक्रवारी प्रदर्शित करण्यात आला. ३ मिनीट ५ सेकंदांचा हा ट्रेलर यूट्यूबवर चांगलाच लोकप्रिय होत आहे. आता पर्यंत २ कोटी चाहत्यांनी हा ट्रेलर पाहिला आहे. सिनेमात खिलाडी अक्षय कुमारसोबत अभिनेत्री परिणीती चोप्रा झळकणार आहे. अनुराग सिंग यांच्या दिग्दर्शनाखाली साकारण्यात आलेला सिनेमा ऐतिहासिक कथेवर आधारलेला आहे. १८९७ साली झालेल्या सारगढीच्या लढाईत ब्रिटीश भारतीय सेनेच्या २१ शिख जवानांनी १० हजार अफगाणी सैनिकांशी झुंज दिली होती.