शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 23 फेब्रुवारी 2019 (14:00 IST)

आलियाने घेतला यूटर्न

ते आले जवळ आणि पुन्हा दूर गेले.. त्यांच्या रोमान्सची जितकी चर्चा झाली.. तितकी ब्रेकअपचीही... दोघांची जोडी रसिकांनी डोक्यावर घेतली. ही जोडी म्हणजे आलिया भट्ट आणि सिद्धार्थ मल्होत्रा. सिद्धार्थ मल्होत्रा, वरुण धवन आणि आलिया भट्ट त्रिकुटाने 'स्टुडन्ट ऑफ द इयर' या पहिल्याच सिनेमातील आपल्या दमदार अभिनयाने रसिकांची मने जिंकली. पहिल्या सिनेमात आलिया आणि सिद्धार्थ दोघांत वेगळीच केमिस्ट्री पाहायला ळिाली. तेव्हापासूनच आलिया आणि सिद्धार्थ यांच्यातील प्रेमाचं नातं बहरत असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. मात्र नंतर बी-टाऊनमध्ये आलिया आणि सिद्धार्थ यांच्यात काही तरी बिनसले आणि या लव्ह बर्डस्‌मध्ये दुरावा निर्माण झाला. दोघांचं ब्रेकअप झाले त्यामुळे ते फारसे एकत्र पाहायला मिळाले नाहीत. आता आलिया रणबीर कपूरला डेट करत असल्याच्या चर्चा सुरू आहेत. यावर आलिया आणि रणबीर यांच्याकडून त्यांच्या प्रेमाचा खुलासा झाला नसला तरीही चुपके चुपके यांच्यात प्रेमाचे नातं फुलले असल्याचे बोलले जाते. एकीकडे रणबीर आलियाच्या प्रेमाचे गोडवे गात असताना दुसरीकडे आलिया मात्र एक्सबॉयफ्रेंड सिद्धार्थला विसरू शकत नसल्याचे समोर आले आहे.