गुरूवार, 20 नोव्हेंबर 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 21 फेब्रुवारी 2019 (11:53 IST)

सिद्धार्थविषयी राग नाही : आलिया

There is no anger about Siddhartha
बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टने 2012 मध्ये 'स्टुडंट ऑफ दी इयर'मधून आपली कारकिर्द सुरू केली. आपल्या पहिल्याच चित्रपटात ती अनेकांची फेवरेट झाली. या चित्रपटानंतर अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रासोबत तिच्या अफेअरच्या बातम्या आल्या होत्या. त्यानंतर दोघे वेगळे झाले आणि आपला प्रवास सुरू केला. मात्र आता दोघांच्या नात्याविषयी आलियाने खुलासा केला आहे. नुकतीच आलियाने सिद्धार्थसोबत असलेल्या बॉन्डींगविषयी प्रतिक्रिया दिली. माझ्या मनात सिद्धार्थविषयी प्रेम आहे. मी त्याला खूप दिवसांपासून ओळखते. आमच्या दोघांध्ये कधीही काही वाद नव्हता. त्यामुळे माझ्या मनात सिद्धार्थविषयी सकारात्मक विचार असून तो देखील असाच विचार करत असेल, असे आलियाने म्हटले.