1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 21 फेब्रुवारी 2019 (12:08 IST)

अमिताभ बच्चन बनले फुटबॉल कोच

amitabh bachchan
बॉलीवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी आपल्या आगामी चित्रपट 'झुंड' ची शूटिंग पूर्ण केली. हा सिनेमा मराठी चित्रपट ‘सैराट’ च्या निर्देशक नागराज मंजुळेद्वारे दिग्दर्शित आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन एक फुटबॉल कोचची भूमिका बजावत आहे. हा चित्रपट 20 सप्टेंबर 2019 रोजी रिलीज होईल. 
 
झुंड नागपूरच्या निवृत्त स्पोर्ट्स टीचर विजय बारसे यांच्या जीवनावर आधारित आहे. विजय यांनी 2001 मध्ये स्लम सॉकर नावाच्या एका एनजीओची स्थापना केली होती. या एनजीओचा उद्देश स्लॅमच्या मुलांना प्रशिक्षण देऊन त्यांना फुटबॉल खेळण्यासाठी प्रेरित करणे आहे. अमिताभने चित्रपटात विजय यांची भूमिका बजावली आहे. 
 
या चित्रपटात ‘सैराट’ ची सुपरहिट जोडी रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर, अमिताभ बच्चनसोबत स्क्रीनवर दिसतील. हे दोन्ही चित्रपटात फुटबॉल टीम्सचे कर्णधारांच्या भूमिकेत असतील.
 
अमिताभ बच्चन या वर्षी अनेक चित्रपटांमध्ये दिसतील. झुंड व्यतिरिक्त 'ब्रह्मास्त्र' मध्ये ते आलिया भट्ट आणि रणबीर कपूरसह दिसतील. तसेच 'बदला' मध्ये अमिताभ पुन्हा एकदा तापसी पन्नूसोबत स्क्रीन शेअर करत आहे.