1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: कॅलिफॉर्निया , मंगळवार, 22 ऑगस्ट 2017 (12:11 IST)

मार्क झुकेरबर्ग घेताय 2 महीन्यांची सुट्टी!

फेसबुकचा संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकेरबर्ग परत एकदा 2 महिन्यांच्या सुट्टीवर जात आहे. तो सुट्टीवर जाणार असल्याची पोस्ट त्याने फेसुबकवर टाकली आहे. त्याच्या घरी पुन्हा एकदा नवीन पाहूण्याचे आगमन होणार असून यासाठी झुकेरबर्गने पुन्हा पितृत्व रजेसाठी अर्ज केला आहे. झुकेरबर्गने शुक्रवारी रात्री उशिरा फेसबुकवर पोस्ट टाकून ही माहिती दिली.
 
झुकेरबर्गने आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हण्टले आहे की, मी पत्नी प्रिसिलासोबत सुरवातीचे काही महिने राहू शकलो, तर ते चांगले होईल. आमची दुसरी मुलगी आता लवकरच जन्म घेणार आहे. मी पुन्हा दोन महिन्यांच्या रजेसाठी अर्ज केला आहे, असे झुकेरबर्गने म्हटले आहे. पत्नी प्रिसिला आणि मुलींसोबत राहण्यासाठी एक महिन्याची रजा घेणार असून त्यानंतर डिसेंबर महिन्यातही त्यांच्यासोबत राहण्यासाठी रजा घेणार असल्याचे झुकेरबर्गने सांगितले आहे.
 
त्याने पुढे लिहीले आहे की, फेसबुक चार महिन्यांची मातृत्व आणि पितृत्व रजा देत असते. अभ्यासातून असे समोर आले आहे की, नोकरी करणारे कुटुंबीय नवीन जन्मलेल्या बालकांसोबत राहतात, तेव्हा संपूर्ण कुटुंबासाठी ते चांगले असते. मी जेव्हा परत कामावर येईन तेव्हा संपूर्ण ऑफिस माझ्यासोबत असेल, अशी मला आशा आहे.