1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: गुरूवार, 29 डिसेंबर 2016 (16:28 IST)

आता वेगवेगळ्या प्रकारची बिले भरण्यासाठी वापरा मोबिक्विक अॅप

यापुढे देशातील सर्व ग्राहक वेगवेगळ्या प्रकारची बिले भरण्यासाठी मोबिक्विक अॅपचा वापर करु शकणार आहेत.  याबाबतची  घोषणा भारतीय ई-वॉलेट कंपनी मोबिक्विकने केली आहे. भारत बिल पेमेंट्स ऑपरेटिंग यूनिटची (BBPOU) स्थापना करण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून मंजुरी मिळवली आहे.
 
मोबिक्विकचे सहसंस्थापक बिपिन प्रीत सिंह यांनी माहिती दिली की, “डिजिटल पेमेंट किंवा ग्रामीण व शहरी भागातील लोकांसाठी मोबाईल फोनवरुन सुरक्षित पेमेंटसाठी मोबिक्विक अत्यंत जबाबदारीने काम करेल. शिवाय, सक्षम सेवा देण्यास मोबिक्विक प्रतिबद्ध आहे.” मोबिक्विकने डिजिटल पेमेंटची सेवा सुरु केल्यानंतर वीज, पाणी, गॅस, टेलिफोन, D2H सर्व्हिस इत्यादी ठिकाणी पैसे भरणं शक्य होईल.