व्हॉट्सअॅप आता ‘डिलिट फॉर एव्हरिवन’
व्हॉट्सअॅप आता ‘डिलिट फॉर एव्हरिवन’ हे खास फिचर अपडेट करणार आहे. अपडेटमुळे समोरच्या व्यक्तीला पाठवलेला एखादा मेसेज डिलीट केलात आणि मेसेज पाठविलेल्या व्यक्तीचा फोन बंद असेल तर त्याला फोन सुरु केल्यावर तो मेसेज मिळणार आहे. 13 तास 8 मिनिटे आणि 16 सेकंदाच्या आत समोरच्याला तुम्ही मेसेज डिलीट केल्याचा संदेश न मिळाल्यास त्याला मेसेज डिलीट केला असला तरीही वाचता येणार आहे. या फिचरचा होणारा गैरवापर लक्षात घेऊन कंपनीने ही नवीन सुविधा लाँच केली आहे. व्हॉट्सअॅपचं हे फिचर पुढच्या आठवड्यापासून कार्यरत होणार आहे.