गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: शनिवार, 13 ऑक्टोबर 2018 (16:17 IST)

पुन्हा एकदा फेसबुकचा डेटा चोरी

फेसबुकच्या २ कोटी ९० लाख युजर्सचा डेटा हॅकर्सने चोरल्याची माहिती समोर आली आहे. फेसबुकनेही या वृत्ताला दुजोरा दिला असून एफबीआय याप्रकरणी पुढील तपास करत आहे. सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यातही ५ कोटी अकाऊंटसची माहिती लीक झाली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा माहिती लीक झाल्याने फेसबुक वापरणे धोक्याचे असल्याचे समोर आले आहे.
 
केंब्रिज अॅनालिटिका प्रकरणात युजर्सचा डेटा चोरून त्याचा गैरवापर केल्याचेही समोर आले होते. त्यानंतर आता १ कोटी चाळीस लाख युजर्सची फेसबुक प्रोफाइलवर असणारी वैयक्तिक माहिती चोरीला गेल्याचे बोलले जात आहे. याआधी झालेल्या हॅकींगमध्ये ‘View As’ या फिचरच्या माध्यमांतून हॅकर्सने माहिती चोरली आहे. सुरक्षेचा विचार करून फेसबुकने ‘View As’ हे फिचर काढून टाकले आहे. हॅकर्सने ‘View As’ या फिचर्सच्या माध्यमांतून एक्सेस टोकन चोरले होते.