1. मराठी बातम्या
  2. आयटी जगत
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: सोमवार, 8 एप्रिल 2024 (16:40 IST)

व्हॉट्सॲप स्टेट्ससाठी आले नवे फीचर्स

इन्स्टंट मेसेजिंग ॲप्लिकेशन म्हणून व्हॉट्सॲपची लोकप्रियता वाढली आहे. 200 कोटींहून जास्त लोक या प्लॅटफॉर्मचा वापर करतात. युजर्सला नवीन अनुभव देण्यासाठी कंपनी वेळोवेळी नवीन फीचर्स आणते. आता व्हॉट्सॲप स्टेट्स साठी एक नवीन फीचर्स आणत आहे. ज्याचा युजर्सला खूप फायदा होणार आहे. 
 
ट्सॲप आता स्टेटस विभागात असे एक फीचर देणार आहे जे तुमच्या स्टेटसची माहिती इतरांना देईल. व्हॉट्सॲप स्टेटससाठी नोटिफिकेशन फीचर आणणार आहे. आता जेव्हा तुम्ही तुमच्या व्हॉट्सॲपवर स्टेटस ॲड करता तेव्हा तुमच्या संपर्कांना सूचित केले जाईल.
व्हॉट्सॲपच्या या आगामी फीचर्सची माहिती व्हॉट्सॲप इन्फो या लोकप्रिय एजन्सीने दिली आहे. या फीचर्सचा सर्वात मोठा फायदा म्हणजे आता कोणीही तुमच्या स्टेट्स कडे दुर्लक्ष करू शकणार नाही. आता प्रत्येकाला तुम्ही लावलेले स्टेट्स पाहावे लागणार. 
 
व्हॉट्सॲप आपल्या वापरकर्त्यांच्या सुरक्षिततेची आणि गोपनीयतेची देखील चांगली काळजी घेते. कंपनी वेळोवेळी नवीन गोपनीयता वैशिष्ट्ये आणत असते. आता व्हॉट्सॲप आपल्या यूजर्ससाठी नवीन प्रायव्हसी फीचर आणणार आहे. या आगामी वैशिष्ट्याच्या मदतीने तुम्ही तुमचे चॅट पूर्णपणे खाजगी ठेवू शकता. वास्तविक, आत्तापर्यंत कंपनी स्मार्टफोनसाठी चॅट लॉक फीचर प्रदान करत होती परंतु आता तुम्ही लिंक केलेल्या उपकरणांमध्येही चॅट लॉक लागू करू शकता. 

 Edited by - Priya Dixit