शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. ऑटोमोबाइल
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: सोमवार, 13 जुलै 2020 (12:26 IST)

OnePlus Nordचा AR लॉन्च बघण्यासाठी 99 रुपये मोजावे लागतील

OnePlus Nord लाँचचे आमंत्रण भारतात विक्रीसाठी उपलब्ध आहे. 21 जुलैला अधिकृत लॉन्च झाल्यानंतर इनवाइट खरेदीदार नवीन वनप्लस स्मार्टफोन ऑगमेंटेड रियालिटी (एआर) अनुभवू शकतील. वनप्लसचा असा दावा आहे की कंपनी Amazonवर लॉचं डे लॉटरी देखील आयोजित करेल, जिथे वनप्लस नॉर्डला लॉन्च करण्यासाठी आमंत्रितांना भेटवस्तू देण्यात येतील. सांगायचे म्हणजे की आगामी स्मार्टफोन परवडणारा असेल, जो भारत आणि युरोपसाठी खास तयार केला गेला आहे.
 
Amazon India OnePlus Nord AR लाँच इनव्हिट 99 रुपयांना खरेदी करता येईल. हे आमंत्रण खरेदी करणार्‍यांना वर्च्युअल लॉचमध्ये भाग घेण्याची संधी मिळेल. लॉचं इव्हेंट पाहण्यासाठी एखाद्याला गूगल पल्ले स्टोअर, ऍपल स्टोअर वरून OnePlus नॉर्ड एआर एप डाऊनलोड करावे लागेल, त्यानंतर तुम्ही नवीन फोनला एआर मधील अनुभव करू शकता आणि लॉन्च इव्हेंट देखील पाहता येईल.
 
कंपनीने जाहीर केलेल्या माहितीनुसार, इनवाइटमध्ये एक क्यूआर कोड आहे, जो वापरकर्त्याला आभासी अनुभव करण्यासाठी वनप्लस नॉर्ड एआर एपावर स्कॅन करणे आवश्यक आहे. कंपनी आपल्या स्मार्टफोनवर ऑन-स्क्रीन सूचना देखील प्रदान करेल, जेणेकरून आपण या एआर इव्हेंटचा सहज अनुभव घेऊ शकता. वनप्लस 21 जुलै रोजी सायंकाळी 7:30 वाजता भारतात वनप्लस नॉर्ड लॉचं करेल.