शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: सोमवार, 27 नोव्हेंबर 2017 (16:47 IST)

रिलायन्स जिओकडून विशेष कॅशबॅक ऑफर

रिलायन्स जिओने युजर्ससाठी विशेष कॅशबॅक ऑफर आणली आहे. या ऑफरसाठी शेवटची तारीख 25 नोव्हेंबर होती.पण आता कंपनीने आपली तारीख 15 डिसेंबर 2017 पर्यंत वाढविली आहे.आता 15 डिसेंबरपर्यंत रिचार्ज करणाऱ्यांना कॅशबॅक ऑफर मिळणार आहे. 399 किंवा त्याहून अधिक 2,599 रुपयांपर्यंतच्या रिचार्जवर कॅशबॅक ऑफर मिळणार आहे. हे रिचार्ज ऑफर ऑनलाइन रिचार्जवरच उपलब्ध असतील.जर तुम्ही 399 रुपये रिचार्ज केले तर तुम्हाला 400 रुपये कॅशबॅक मिळणार आहे. यामध्ये तुम्हाला 50-50 रुपयांचे 8 वाऊचर मिळतील. 399 रिचार्ज केल्यानंतर पुढील आठ रिचार्जवर 50 रुपयांची सूट मिळेल. याचा अर्थ 399 चा रिचार्ज 349 रुपयांना मिळेल. चारशे रुपयांचे हे व्हाउचर जिओ अॅपवर मिळतील. म्हणजे 400 रुपये थेट अॅपवर मिळतील. 300 रुपयांचं मोबाईल वॉलेट आणि वाचलेले पैशे शॉपिंग व्हाउचरमध्ये मिळतील.
 
जर तुम्ही दुसऱ्या डिजिटल वॉलेटमधून रिचार्ज केले तरी तुम्हाला ही कॅशबॅक ऑफर मिळेल. MobiKwik वरुन रिचार्ज करतांना जिओच्या नवीन युजर्सने NEWJIO कोड टाकावे. यानंतर 399 च्या रिचार्जवर तुम्हाला 300 रुपये कॅशबॅक मिळतील. जिओच्या जुन्या युजर्सने JIO149 कोड टाकावा. यामध्ये त्यांना 149 ची कॅशबॅक मिळेल.