गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: बुधवार, 24 जानेवारी 2018 (15:30 IST)

प्रजासत्ताक दिनानिमित्ताने जीओची धमाकेदार ऑफर

रिलायन्स जिओने प्रजासत्ताक दिनानिमित्त त्यांच्या ग्राहकांसाठी आणखी एक धमाकेदार निर्णय घेतला आहे.  जिओने आता 26 जानेवारीपासून त्यांच्या 1 जीबी आणि 1.5 जीबी प्रतिदिन डाटा वापरकरर्त्यांना आणखी 500 एमबी लिमिटवाढ दिली आहे.  रिपब्लिक डे ऑफर अंतर्गत 26 जानेवारीपासूनच सध्याच्या 98 रूपये पॅकची मुदत 14 दिवसांवरून 28 दिवसांपर्यंत वाढवली आहे. जिओने ग्राहकांना नेहमीच वाढीव लाभ दिले आहेत. प्लॅननुसार 50 टक्के जादा डाटा देतानाच जिओने प्रतिस्पर्ध्यांपेक्षा 50 रूपये कमी प्लॅनवर आकारले आहेत. 26 जानेवारीपासून 1 जीबी डाटा मर्यादा 1.5 जीबी होईल, तर 1.5 जीबी डाटा मर्यादा 2 जीबीपर्यंत वाढणार आहे.

भारती एअरटेलने अलिकडेच 399 रूपयांची ऑफर जाहीर करताना अमर्यादित कॉल्स आणि 1 जीबी 4 जी डाटा 84 दिवसांसाठी देवू केला होता. जिओ नव्या ऑफरद्वारे 399 रूपयांच्या प्लॅनवर मोफत व्हॉईस, अनलिमिटेड 4 जी डाटा अंतर्गत 1.5 जीबी प्रतिदिन, अमर्यादित एसएमएस आणि 84 दिवसांसाठी जिओ अ‍ॅप प्रिमियम सबस्क्रिप्शन देणार आहे. सध्या 14 दिवसांसाठीच्या 98 रूपयांच्या पॅकवर जिओ 2.1 जीबी 4 जी डाटा देते. यानंतर 64 किलोबाईट प्रतिसेकंद असा स्पीड कमी होतो.