मंगळवार, 26 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. ऑटोमोबाइल
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: शुक्रवार, 10 जुलै 2020 (22:37 IST)

सॅमसंगने भारतात स्मार्टवॉच ‘गॅलेक्सी वॉच अ‍ॅक्टिव्ह 2’लाँच

Samsung Galaxy Watch Active 2
सॅमसंगने भारतीय बाजारात  स्मार्टवॉच ‘गॅलेक्सी वॉच अ‍ॅक्टिव्ह 2’ एका नवीन व्हेरिअंटमध्ये  लाँच केलं आहे. हे कंपनीचं पहिलं मेड इन इंडिया वॉच असून यापूढील सर्व गॅलेक्सी स्मार्टवॉच भारतातच मॅन्युफॅक्चर केले जातील अशी घोषणाही कंपनीने केली आहे.
 
नवीन वॉचमध्ये 4G LTE, वाय-फाय आणि 39 वर्कआउट टॅकर्ससह अनेक फीचर्स आहेत. अ‍ॅक्वा ब्लॅक, क्लाउड सिल्वर आणि पिंक गोल्ड कलर अशा तीन रंगांच्या पर्यायांमध्ये हे वॉच उपलब्ध असेल. 11 जुलैपासून या वॉचची विक्री सुरू होईल. अधिकृत सॅमसंग रिटेल स्टोअर्स, सॅमसंग ओपेरा हाउस, सॅमसंग डॉटकॉम आणि प्रमुख ऑनलाइन पोर्टल्सद्वारे वॉच खरेदी करता येईल. या स्मार्टवॉचच्या खरेदीवर कंपनीकडून काही खास ऑफरही आहेत. यामध्ये 10 टक्के कॅशबॅक आणि 6 महिन्यांसाठी नो-कॉस्ट इएमआयची ऑफर मिळेल. ही ऑफर 31 जुलैपर्यंत असेल.
 
या स्मार्टवॉचला 1.4-इंच सुपर अ‍ॅमोलेड डिस्प्लेसह राउंड डिस्प्ले पॅनलच्या प्रोटेक्शनसाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास DX+ आहे. तसेच, यामध्ये 1.5GB रॅम, 4GB इंटर्नल स्टोरेज, 4G LTE, वाय-फाय, NFC, ब्लूटूथ v5.0, GPS आणि ग्लोनास यांसारखे फीचर्स आहेत. 340mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली असून अनेक थर्ड पार्टी अ‍ॅप्सचा वापर या वॉचमध्ये करता येतो. हार्ट-रेट सेन्सर, ECG सेन्सर, अॅक्सेलरोमीटर असे अनेक फीचर्स यामध्ये आहेत. 28,490 रुपये इतकी या स्मार्टवॉचची किंमत आहे.