बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी जगत
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: सोमवार, 9 जानेवारी 2023 (13:46 IST)

Phone hacking फोन हॅकिंगपासून सुरक्षा

सध्या स्मार्टफोनचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला असून, त्यासोबतच हॅकिंग आणि फ्रॉडची प्रकरणंही मोठ्या प्रमाणात वाढली आहेत. फोनच्या सेटिंगमध्ये काही बदल करुन हॅकिंग आणि ऑनलाईन फ्रॉडपासून बचाव केला जाऊ शकतो.
 
फोनमध्ये अनेकदा अनेक Apps आणि वेबसाईट्स, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक, ट्विटरला लॉगइन करण्याची परवानगी देतात. परंतु असं धोकादायक ठरू शकतं. अनेक Apps युजर्सची पर्सनल माहिती फेसबुक आणि ट्विटरवरुन चोरी करतात. त्यामुळे सावध राहणं गरजेचं आहे.
 
युजर्सने आपली प्रायव्हसी सुरक्षित ठेवण्यासाठी आपल्या फोनचं लोकेशन Turn Off ठेवावं. ज्यामुळे Apps तुमचं लोकेशन ट्रॅक करू शकणार नाही. iPhone युजर्स असल्यास, फोनच्या प्रायव्हसी सेटिंग्समध्ये जाऊन लोकेशन ऑफ करता येईल. Android Users ला लोकेशन बंद करण्यासाठी फोनच्या सेटिंगमध्ये लोकेशन टर्न ऑफ, लोकेशन हिस्ट्री तसंच Apps अॅक्सिसही हटवणं गरजेचं आहे.
 
इंन्स्टंट ऑटो लॉक ऑप्शन फोनसाठी अतिशय आवश्यक ठरतो. जर तुम्ही फोन लॉक करणं विसरलात, तर हे फीचर एखाद्या दुसऱ्या युजरला तुमचा फोन एक्सेस करण्यापासून रोखतं. यासाठी युजर्स फोनच्या सेटिंगमध्ये ऑटो लॉक एनेबल करू शकतात.