1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
  4. Telenor India offer, 56 GB 4G data

टेलीनॉर धमाका: 47 रुपयात 56 जीबी 4जी डेटा

टेलीनॉर ग्राहकांना अवघ्या 47 रुपयात तब्बल 56 जीबी 4जी डेटा देणार आहे. हा प्लान 28 दिवसांसाठी वैध असणार आहे. या प्लानमध्ये यूजर्सला 80 पैशात 1 जीबी डेटा मिळेल. सध्या हा प्लान फक्त इनव्हाइट मिळणाऱ्या यूजर्सनाच घेता येणार आहे. म्हणजेच हा प्लान सध्या invite-only आहे. 
 
कंपनी आपल्या खास यूजर्सला यासाठी मेसेज पाठवत आहे. म्हणजेच जोवर तुम्हाला कंपनीकडून इनव्हाइट मेसेज येणार नाही तोवर तुम्ही हा प्लान सब्सक्राईब करु शकत नाही. तसेच हा प्लान टेलीनॉरच्या नेटवर्क सर्कलमध्येच अॅक्टिव्हेट होणार आहे.
पुढील लेख
सदाभाउ खोत ससून रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल