शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. ऑटोमोबाइल
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: शुक्रवार, 18 सप्टेंबर 2020 (13:40 IST)

डेबिट कार्डला विसरा, SBI ची खास वैशिष्ट्ये, आता घड्याळाने करता येईल पेमेंट...

काहीही खरेदी केल्यानंतर पेमेंट करण्यासाठी डेबिट कार्ड आणि स्मार्टफोनवर पेमेंट अ‍ॅपची गरज असते, पण आता आपण मनगटाच्या घड्याळाने कोणतेही पेमेंट करू शकाल. 
 
टायटनने प्रथमच भारतात कॉन्टॅक्टलेस पेमेंट्स (Contactless Payment) ला समर्थन देणारी 5 घड्याळी लॉन्च केल्या आहेत. कंपनीने यासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया सह भागीदारी केली आहे. 
 
टायटनच्या पेमेंट वॉचच्या सुविधेचा फायदा केवळ स्टेट बँक ऑफ इंडियाचे कार्ड धारकच घेऊ शकतात. 
 
जर आपण 2000 रुपयापर्यंत चे पेमेंट करीत असल्यास तर केवळ घड्याळीला टॅप केल्यानेच पेमेंट होणार. यासाठी कोणत्याही पिनची आवश्यकता नसणार, परंतु 2000 रुपयांपेक्षा जास्त पेमेंट करण्याची वेळ आल्यावर वाई फाई सुविधेसह असलेल्या डेबिट कार्ड प्रमाणेच पिन टाकण्याची आवश्यकता असणार. 
 
पेमेंटसाठी आपल्याला केवळ POS मशीन जवळ जाऊन Titan Pay Powered Watch टॅप करावयाचे आहे. असे केल्याने आपले कॉन्टॅक्टलेस पेमेंट पूर्ण होणार. जसे की वाई फाई सुविधा असलेल्या डेबिट कार्डाच्या द्वारे पेमेंट होतं. टायटन पेमेंट वॉच सुविधा फक्त SBI कार्ड धारकांसाठी आहे.
 
किंमत किती असणार -
टायटनच्या या नवीन शृंखलेत पुरुषांसाठी तीन आणि स्त्रियांसाठी दोन व्हेरियंट लॉन्च करण्यात आले आहे. पुरुषांसाठी जी मनगट घड्याळ लॉन्च करण्यात आली आहे त्याची किंमत सुमारे 2,995 रुपये 3,995 रुपये आणि 5,995 रुपये आहे, तर बायकांच्या घड्याळीची किंमत सुमारे 3,895 रुपये आणि 4,395 रुपये असणार. 
 
या घड्याळीत दिले गेलेले पेमेंट फंक्शन एका विशेष सिक्यॉर्ड सर्टिफाइड नियर-फील्ड कम्युनिकेशन चिप (NFC) च्या मार्फत काम करतं जे घड्याळीच्या पट्ट्यात लावले गेले आहेत. टायटन पे फीचर YONO SBI ने powerd आहे आणि हे फक्त त्याच जागी काम करेल ज्या जागी POS (पॉइंट ऑफ सेल) मशीन उपलब्ध असेल.