मंगळवार, 4 मार्च 2025
  1. मराठी बातम्या
  2. ऑटोमोबाइल
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: मंगळवार, 30 नोव्हेंबर 2021 (14:10 IST)

भारताशी जवळचे नाते असलेले ट्विटरचे नवे सीईओ पराग अग्रवाल, जाणून घ्या कोण आहेत

जगातील सर्वात मोठी सोशल नेटवर्किंग साइट ट्विटरच्या सीईओची जबाबदारी एका भारतीयावर सोपवण्यात आली आहे. त्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे .भारतीय वंशाचे पराग अग्रवाल हे ट्विटरचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी असतील.आयआयटी मुंबईमध्ये शिकलेले आणि ट्विटर कंपनीचे चीफ टेक्निकल ऑफिसर (CTO) पराग अगरवाल यांची ट्विटरच्या कार्यकारी प्रमुख पदी (CEO) निवड करण्यात आली आहे.
ते ट्विटरचे सहसंस्थापक जॅक डोर्सी यांची जागा घेणार आहे. 
पराग अग्रवाल यांनी भारतातील प्रतिष्ठित तंत्रज्ञान संस्था, IIT बॉम्बे येथून शिक्षण घेतले आहे. जॅक डोर्सी यांनी स्वतः सांगितले की परागकडे अभियांत्रिकीची पदवी आहे आणि त्यांनी स्टॅनफोर्ड विद्यापीठातून डॉक्टरेट केली आहे.
अग्रवाल 2011 पासून Twitter वर काम करत आहेत आणि 2017 पासून CEO बनण्यापूर्वी ते Twitter चे CTO (चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर) होते.
जेव्हा ते कंपनीत सामील झाले तेव्हा त्याचे कर्मचारी संख्या 1,000 पेक्षा कमी होती. पराग कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनीअर म्हणून रुजू झाले.
पराग अग्रवाल यांनी ट्विटरच्या आधी मायक्रोसॉफ्ट, याहू आणि एटी अँड टी लॅबसाठीही काम केले आहे हे उल्लेखनीय. त्यांनी कॉम्प्युटर सायन्समध्ये बी.टेकही केले आहे.
डोर्सी यांनी कौतुक केले
डोर्सी यांनी पराग अग्रवालचे कौतुक करत म्हटले की, ट्विटरचा सीईओ या नात्याने माझा पराग यांच्यावर गाढ विश्वास आहे. गेल्या 10 वर्षात त्यांनी केलेले काम अभूतपूर्व आहे. पराग अग्रवाल यांनी Twitter च्या BlueSky प्रयत्नाचे नेतृत्व केले आहे ज्याचा उद्देश सोशल मीडियासाठी खुले आणि विकेंद्रित मानक तयार करणे आहे.
डोर्सीच्या मते, पराग अग्रवालचे कौशल्य, हृदय आणि व्यक्तिमत्त्व उत्कृष्ट आहे. परागचे आपण खूप आभारी असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्यासाठी नेतृत्व करण्याची वेळ आली आहे.