1. मराठी बातम्या
  2. आयटी जगत
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: शुक्रवार, 21 एप्रिल 2023 (11:39 IST)

ट्विटरने हटवले सेलिब्रेटींचे ब्लू टिक, सीएम योगीपासून शाहरुख खान यांसारख्या दिग्गजांचा समावेश

Twitter removes legacy blue checkmarks
Twitter Blue Tick मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरने अशा लोकांच्या अधिकृत खात्यांमधून ब्लू टिक्स काढण्यास सुरुवात केली आहे ज्यांनी कंपनीचा ब्लू प्लॅन घेतला नाही. या लोकांमध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, माजी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, बॉलीवूड स्टार अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान यांसारख्या दिग्गजांचा समावेश आहे.
 
ट्विटरने अनेक राज्यांच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या अकाऊंटवरून ब्लू टिक्स काढून टाकल्या आहेत. विराट कोहली आणि रोहित शर्मा यांसारख्या क्रिकेट स्टार्सच्या खात्यातूनही ब्लू टिक काढण्यात आली. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या खात्यातूनही ब्लू टिक काढण्यात आली होती.
 
राजकारणी, चित्रपट तारे, क्रिकेट स्टार आणि इतर दिग्गजांच्या खात्यातून ब्लू टिक हटवताच सोशल मीडियावर खळबळ उडाली. पैसे मिळताच ट्विटर या लोकांच्या खात्यांवर ब्लू टिक लावून त्यांचे खाते सत्यापित करेल.
 
विशेष म्हणजे ट्विटरचे मालक एलोन मस्क यांनी याआधीच याची घोषणा केली होती. 20 एप्रिलनंतर, ज्यांनी सशुल्क सदस्यता घेतली नाही अशा खात्यांमधून ब्लू टिक्स काढून टाकण्याची घोषणा केली होती. त्यांनी स्पष्टपणे सांगितले होते की जर ब्ल्यू टिक आवश्यक असेल तर त्यासाठी मासिक शुल्क भरावे लागेल.
 
ट्विटर ब्लूची भारतातील किंमत मोबाइल आवृत्तीसाठी प्रति महिना 900 रुपये आणि वेब आवृत्तीसाठी 650 रुपये निश्चित करण्यात आली आहे.