गुरूवार, 28 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. ऑटोमोबाइल
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: शुक्रवार, 8 मे 2020 (13:58 IST)

Vista Equity Partners ने Reliance Jio मधील २.३२ टक्के हिश्श्याची खरेदी केली

Vista Equity Partners picks 2.32 percent stake in Jio Platforms
अमेरिकन गुंतवणूक कंपनी असलेली व्हिस्टा इक्विटी पार्टनर्सने रिलायन्स जिओमध्ये गुंतवणूक केली आहे. 'व्हिस्टा इक्विटी पार्टनर'ने जियो प्लॅटफॉर्ममधील २.३२ टक्के हिश्श्याची खरेदी केली आहे. या भागीदारीसाठी कंपनी ११ हजार ३६७ कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. 
 
व्हिस्टा इक्विटी पार्टनर्सने R-Jio मध्ये गुंतवणूक तंत्रज्ञान पार्टनर रुपात केली आहे. गेल्या तीन आठवड्यांत 'जिओ'मधील ही तिसरी मोठी गुंतवणूक आहे. जिओ प्लॅटफॉर्मचे इक्विटी मूल्य अंदाजे ४.९१ लाख कोटी रुपये आणि एंटरप्राइझ मूल्य ५.१६ लाख कोटी रुपये झाले आहे. 
 
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष मुकेश अंबानी म्हणाले, यांनी एक महत्वाचा भागीदार म्हणून व्हिस्टाचे स्वागत केले आहे. त्यांनी म्हटले की व्हिस्टाची दूरदृष्टी सामायिक आहे. सर्व भारतीयांच्या हितासाठी भारतीय डिजिटल इको सिस्टीम विकसित आणि कायापालट करण्याचा आमचा दृष्टिकोन आहे. 
 
विस्टा कंपनीचे भांडवल ५७ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त आहे. कंपनीकडे एंटरप्राइझ सॉफ्टवेअर गुंतवणूकीचा २० वर्षांहून अधिक अनुभव आहे. व्हिस्टा पोर्टफोलिओचे १३ हजार कर्मचारी आहेत. भारतात Vista Equity Partners ची ही प्रथम गुंतवणूक आहे.