शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: गुरूवार, 30 एप्रिल 2020 (22:32 IST)

रिलायन्समध्ये वेतन कपात, सर्व संचालकांच्या पगारामध्ये ३०-५० टक्के कपात

रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वात कंपनीने हायड्रोकार्बन व्यवसायाशी संबंधित कर्मचार्‍यांचे वेतन कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. रिलायन्सच्या हायड्रोकार्बन व्यवसायात काम करणाऱ्या ज्यांचा वार्षिक पगार १५ लाख किंवा त्याहून अधीक असणाऱ्या कर्मचार्‍यांच्या पगारामध्ये १० टक्क्यांनी कपात केली जाणार आहे. कंपनीचे म्हणणं आहे की ज्यांचे वेतन वार्षिक १५ लाखांनी कमी असेल त्यांच्या पगारामध्ये कोणतीही कपात केली जाणार नाही. त्याचबरोबर रिलायन्स कंपनीत काम करणाऱ्या सर्व संचालकांच्या पगारामध्ये ३०-५० टक्के कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या व्यतिरिक्त, कामगिरीवर आधारित बोनसही आतासाठी पुढे ढकलण्यात आले आहेत.
 
बिझनेस स्टँडर्डच्या अहवालानुसार कंपनीचे एमडी आणि अध्यक्ष मुकेश अंबानी स्वत: एक वर्षाची भरपाई घेणार नाहीत. कंपनीचे म्हणणे आहे की लॉकडाऊनमुळे पेट्रोलियमच्या मागणीत लक्षणीय घट झाली आहे, ज्यामुळे हायड्रोकार्बन व्यवसायाचा महसूल घटला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे कार्यकारी संचालक हितल आर मेसवानी यांनी कंपनीच्या या निर्णयाबाबत कर्मचार्‍यांना पत्र पाठवले आहे. नफ्यातील घट लक्षात घेता वेतन कपातीचा हा निर्णय घेतला असल्याचं या पत्रात नमूद केलं आहे.