मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. ऑटोमोबाइल
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: बुधवार, 6 मे 2020 (22:12 IST)

पुन्हा एकदा ‘डबल डेटा’ ऑफर

टेलिकॉम कंपनी व्होडाफोन-आयडियाने पुन्हा एकदा ‘डबल डेटा’ ऑफर आणली आहे. एप्रिलमध्ये कंपनीने डबल डेटा ऑफर महाराष्ट्र-गोव्यासह आंध्रप्रदेश, बिहार, गुजरात, केरळ, नॉर्थ इस्ट, पंजाब, उत्तर प्रदेश (पश्चिम) या देशातील आठ सर्कलमध्ये बंद केली होती. त्यामुळे केवळ 14 सर्कलसाठीच ही ऑफर उपलब्ध होती. मात्र, आता कंपनीने ही ऑफर पुन्हा एकदा आणली आहे. नव्या ऑफरनुसार आता ग्राहकांना पाच प्रीपेड प्लॅनवर दररोज दुप्पट इंटरनेट डेटा मोफत मिळेल.
 
हे प्लॅन्स 299 रुपये, 399 रुपये, 449 रुपये, 599 रुपये आणि 699 रुपयांचे आहेत. कंपनीच्या 299 रुपयांच्या प्लॅनमध्ये दररोज 28 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह 2GB डेटा मिळतो. पण, आता या प्लॅनमध्ये दुप्पट म्हणजे अतिरिक्त 2GB डेटा मिळेल. एकूण 4GB डेटासह यामध्ये अनलिमिटेड कॉलिंग, दररोज 100SMS, व्होडाफोन प्ले आणि Zee5 चं मोफत सबस्क्रिप्शनही मिळेल. याशिवाय, 449 रुपये आणि 699 रुपयांच्या प्लॅनमध्येही 299 रुपयांच्या प्लॅनप्रमाणेच सर्व सेवा मिळतील. मात्र, या प्लॅन्सची व्हॅलिडिटी अनुक्रमे 56 दिवस आणि 84 दिवस आहे.
 
तर, 399 रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज 1.5GB डेटा मिळतो. पण, आता यामध्येही अतिरिक्त 1.5GB डेटा म्हणजे एकूण 3GB डेटा मिळेल. 56 दिवसांची व्हॅलिडिटी असलेल्या या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग, दररोज 100SMS, व्होडाफोन प्ले आणि Zee5 चं मोफत सबस्क्रिप्शन मिळेल. तसेच, 599 रुपयांच्या प्लॅनमध्येही 399 रुपयांच्या प्लॅनप्रमाणेच सर्व सुविधा मिळतात. मात्र, या प्लॅनची वैधता 84 दिवस आहे. आंध्र प्रदेश, आसाम, दिल्ली, जम्मू-काश्मीर, कोलकाता, मध्यप्रदेश, मुंबई, ओडिशा, राजस्थान, यूपी ईस्ट आणि पश्चिम बंगाल या सर्कलमध्ये कंपनीचे पाचही प्लॅन उपलब्ध आहेत.