सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: शनिवार, 1 जून 2019 (17:42 IST)

Vodafone ने लॉन्च केलं स्वस्त प्लॅन, दररोज अनलिमिटेड कॉलिंगसह मिळेल 2 जीबी डेटा

टेलिकॉम कंपनी व्होडाफोनने आपल्या ग्राहकांच्या सुविधेसाठी एक नवीन प्रीपेड प्लॅन सादर केला आहे. Vodafone च्या या प्लॅनची किंमत 229 रुपये आहे आणि या प्लॅनमध्ये आपल्याला अनलिमिटेड कॉलिंगसह दररोज 2 जीबी डेटा मिळेल. व्होडाफोनच्या या प्लॅनची वैधता 28 दिवसांची आहे. अशामध्ये आपल्याला एकूण 56 जीबी डेटा मिळेल.
 
व्होडाफोनच्या या प्लॅनमध्ये ग्राहकांना लोकल, एसटीडी आणि रोमिंग दरम्यान देखील अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळेल. तसेच या योजनेत ग्राहकांना दररोज 100 एसएमएस देखील मिळतील. याव्यतिरिक्त, व्होडाफोन आपल्या या प्लॅनमध्ये व्होडाफोन प्लॅन अॅपची सुविधा देत आहे, याच्या मदतीने ग्राहक मोफतामध्ये लाइव्ह पाहू शकतील. 
 
यापूर्वी व्होडाफोनने आपल्या सर्व सर्कलमध्ये 255 रुपयांच्या प्लॅन सादर केला होता पण आता हा प्लॅन काढून टाकला आहे. विशेष गोष्ट म्हणजे 229 रुपयांच्या या योजनेत 255 रुपयांच्या प्लॅन सारख्या सुविधा मिळत आहे. अशामध्ये स्पष्ट आहे की कंपनीने आपल्या ग्राहकांना भेट देण्यासाठी 255 रुपयांची योजना स्वस्त केली आहे. 
 
महत्त्वाचे म्हणजे सुमारे एक महिना पूर्वी व्होडाफोनने 16 रुपयांचा एक प्लॅन लॉन्च केला होता ज्यात ग्राहकांना एक दिवसांच्या वैधतेसह 1 जीबी डेटा मिळतो. अशा परिस्थितीत, व्होडाफोन ग्राहक विद्यमान योजनेचा डेटा संपल्यानंतर या योजनेचा लाभ उचलू शकतात.