मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: बुधवार, 22 मे 2019 (14:56 IST)

JIO ने 94 लाख ग्राहक जोडले, तर Airtel, Vodafone-Idea ने 3 कोटी ग्राहक गमावले

व्होडाफोन आयडिया आणि भारती एअरटेलने मार्चमध्ये संयुक्तपणे सुमारे 3 कोटी ग्राहक गमावले आहे. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय) च्या आकडेवारीनुसार मार्च महिन्यात व्होडाफोन-आयडिया च्या ग्राहकांची संख्या 1.45 कोटी कमी झाली आहे तर भारती एअरटेलचे 1.51 कोटी कनेक्शन कमी झाले आहे. त्याच वेळी JIO ने 94 लाख ग्राहक जोडले आहे.
 
आकडेवारीनुसार, 31 मार्च 2019 पर्यंत देशात एकूण मोबाइल ग्राहकांची संख्या 116.18 कोटी होती जे मागील महिन्याच्या तुलनेत 2.18 कोटी कमी आहे. मार्चच्या अखेरीस देशात एकूण फोन घनता कमी होऊन 90.11 वर आली आहे, जे फेब्रुवारीमध्ये 91.86 होतं. ट्रायनुसार मार्च 2019 पर्यंत, व्होडाफोन-आयडिया च्या मोबाइल कनेक्शनची संख्या 39.48 कोटी होती. मार्चच्या अखेरीस भारती एअरटेलच्या मोबाइल ग्राहकांची संख्या 32.51 कोटी राहिली, जेव्हा की त्याच्या प्रतिस्पर्धी रिलायन्स जिओकडे 30.67 कोटी ग्राहक होते. 
 
ट्रायनुसार मार्चमध्ये एकूण ग्राहकांची संख्या 116.18 कोटी होती, हे फेब्रुवारीच्या अखेरीस 118.36 कोटी होती. शहरी भागात मार्चच्या शेवटी मोबाइल ग्राहकांची संख्या 65.04 कोटी राहिली, जे फेब्रुवारीच्या शेवटी 65.65 कोटी होती. त्याचप्रमाणे ग्रामीण भागातही मोबाइल ग्राहकांची संख्या 52.71 कोटीहून कमी होऊन 51.13 कोटी राहून गेली.