1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified सोमवार, 13 मे 2019 (18:35 IST)

जिओची शानदार ऑफर, ग्राहकांना 1 वर्षाची मोफत प्राइम मेम्बरशिप

रिलायंस जिओ थोड्या थोड्या दिवसात आपल्या ग्राहकांना सरप्राइज देत असतो. आपल्याला माहिती असेल की जिओ सेलिब्रेशन ऑफर अंतर्गत बर्‍याच वेळा आपल्या ग्राहकांना 8-10 जीबी फ्री डेटा देतो, तसेच रिलायन्स जिओने यावेळी पुन्हा एकदा आपल्या ग्राहकांना सरप्राइज गिफ्ट दिलं आहे, ग्राहकांना 1 वर्षासाठी याचा फायदा होईल. चला जाणून घ्या ऑफरबद्दल:
 
आपल्याला लक्षात असेल की सुरुवातीच्या काळात रिलायन्स जिओने प्राइम मेंबरशिपची घोषणा केली होती. प्राइम मेंबरशिप अंतर्गत ग्राहकांना एका वर्षासाठी जिओ अॅप्सचे फ्री सब्स्क्रीप्शन मिळेल. आता कंपनीने आपल्या विद्यमान सदस्यांची मोफत प्राइम मेंबरशिप 1 वर्षासाठी वाढविली आहे. अशा परिस्थितीत ग्राहकांना 99 रुपयांचा लाभ मिळाला असून 1 वर्षापर्यंत जिओ ग्राहकांना जिओ अॅप्सची फ्री ऍक्सेस मिळत राहील. 
 
पण आपल्या जिओ नंबरची प्राइम मेंबरशिप रिन्यू झाली आहे की नाही, हे कसं माहिती पडेल? हे ही जाणून घ्या:
 
जर आपल्या फोनवर माय जिओ अॅप असेल किंवा नसेल तर आधी ते डाउनलोड करावे. त्यानंतर अॅप ओपन करा. अॅपमध्ये खाली आपल्या डाव्या बाजूला आपल्याला आपली योजना दिसेल. योजनेच्या किमतीच्या खाली व्यूह डिटेलवर क्लिक करा. त्यानंतर जे मेन्यू दिसेल त्यात आपल्याला जिओ प्राइम मेम्बरशिपचा पर्याय दिसेल. येथून आपल्याला कळेल की आपली प्राइम मेंबरशिप रिन्यू झाली आहे वा नाही. 
 
जिओ प्राइम मेंबरशिप फक्त विद्यमान ग्राहकांसाठी रिन्यू होईल. नवीन ग्राहकांना आता देखील प्राइम मेंबरशिपसाठी 99 रुपये भरावे लागतील.